शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

स्वच्छ चंद्रपूरसाठी सर्वांचा हातभार महत्त्वाचा

By admin | Updated: February 23, 2017 00:37 IST

देशाची संपूर्ण स्वच्छतेकडे वाटचाल सुरू आहे. स्वच्छतेच्या या अभियानात जिल्हाही मागे राहता कामा नये.

सुधीर मुनगंटीवार : चंद्रपूरकरांना नि:शुल्क डस्टबीनचंद्रपूर : देशाची संपूर्ण स्वच्छतेकडे वाटचाल सुरू आहे. स्वच्छतेच्या या अभियानात जिल्हाही मागे राहता कामा नये. जिल्ह्यासह चंद्रपूर शहर सर्वाधिक स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपूर शहर स्वच्छ अभियानांतर्गत महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना डस्टबीनचे वाटप करण्यात येत आहे. आज काही नागरिकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महानगरपालिकेच्या गांधी चौकाजवळील मैदानात डस्टबीन वाटपाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी पालकमंत्र्यांसह आमदार नाना शामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंत देशमुख, आयुक्त संजय काकडे, मनपा सभापती एस्तेर शिरवार आदी उपस्थित होते. चंद्रपूर जिल्हयाने शंभर टक्के शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट हाती घेतले आहे. शहरी व ग्रामीण भागात शौचालयाची मोहिम राबविण्यात येत आहे. शौचालयासोबतच इतर स्वच्छताही महत्वाची आहे. महानगरपालिकेने त्यासाठी चांगला पुढाकार घेतला असून शहरवासियांचे यासाठी सहकार्य आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले.दरदिवशी निघणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रत्येक कुटूंबास डस्टबीन वितरीत केली जात आहे. या डस्टबीनमधील कचरा महानगरपालिकेच्या वतीने जमा केला जाईल. ८२ हजार २० मालमत्ताधारकांना सदर डस्टबीनचे वितरण केले जाणार आहे. यासाठी मनपा निधी अंतर्गत ७२ लाख ५८ हजार रुपये खर्च करण्यात येत आहे. प्रत्येक मालमत्ता धारकास हिरवी व निळी अशा दोन डस्टबीन दिल्या जाणार असून एकात ओला तर एका डस्टबीनमध्ये सुका कचरा टाकला जाणार आहे.शहरात शौचालयाचा कार्यक्रमही मनपाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर राबविला जात असून सहा हजार ६९२ इतके वैयक्तीक शौचालयाचे मनपाचे उद्दिष्ठ आहे. तर पाच हजार १५० शौचालये बांधकाम पूर्ण झाले. तर एक हजार ५४२ बांधकाम प्रगतीपथावर आहे. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुक्त संजय काकडे यांनी केले. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अभ्यासिकेचे लोकार्पणमहानगरपालिकेच्या निधीतून बांधण्यात आलेल्या भानापेठ वार्ड येथील अभ्यासिकेचे लोकार्पणही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. ३९ लाख ४५ हजार रुपये खर्च करून ही अभ्यासिका बांधण्यात आली आहे. होतकरू विद्यार्थ्यांना युपीएससी, एमपीएससी तसेच अन्य स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ही अभ्यासिका फार उपयोगी ठरेल, असे ना. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापौर राखी कंचलार्वार यांनी केले. यावेळी पालमंत्र्यांची पुस्तक तुला करण्यात आली.