शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

भद्रावतीच्या गुरुदेव भक्तांकडून पंढरपुरात स्वच्छता

By admin | Updated: August 1, 2016 00:37 IST

पंढरपूर येथे पार पडलेल्या आषाढी एकादशी महोत्सवात संपुर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांनी उपस्थिती दर्शविली.

भद्रावती : पंढरपूर येथे पार पडलेल्या आषाढी एकादशी महोत्सवात संपुर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांनी उपस्थिती दर्शविली. त्यामुळे पंढरपुरात निर्माण झालेला घान, कचरा साफ करण्यासाठी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात भद्रावती येथील स्थानिक श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवून योगदान दिले.श्री गुरुदेव सेवा मंडळ भद्रावतीचे जेष्ठ कार्यकर्ते तथा जीवन प्रचारक जगन्नाथ गावंडे, बालाजी नागपुरे यांच्या नेतृत्वात भद्रावती, वरोरा, कोरपनासह चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास १०० कार्यकर्ते पंढरपुरात दाखल झाले. तसेच संपुर्ण महाराष्ट्रातून ४५० ते ५०० कार्यकर्त्यांनी या स्वच्छता अभियानात भाग घेतला होता. त्यात महिलांचा सुद्धा समावेश होता. वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेत १२ व्या अध्यायात ग्रामस्वच्छतेचे महत्त्व सांगितले. त्यांच्या या विचाराला अनुसरून मागील वर्षापासून अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाने पंढरपुरात आषाढी एकादशी महोत्सव संपल्यानंतर हे स्वच्छता अभियान राबविण्याचा संकल्प केला. त्यामुळे शहराची स्वच्छता करण्यासाठी स्थानीक प्रशासनाला चांगलीच मदत झाली.या अभियानात रोज सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत परिसर स्वच्छता करण्यात आली. त्यात मंदिर, चंद्रभागा परिसर, सोलापूर रोड, गोपालपूर रोड, सांगली रोड, हनुमान मंदिर स्वच्छ करण्यात आले. हे अभियान सेवकराम मिलमिले यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आले. श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्याला नारखेडे दादा, वैद्य गुरुजी, सुरेश चौधरी, काळे गुरुजी प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)