शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षण लीग स्पर्धेची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:57 IST

१२ जून २०१४ पासून सुरु झालेल्या स्वच्छता मोहिमेत चंद्र्रपूर शहर सहभागी झाले. यामध्ये उत्कृष्ट कामगिरीही केली. आता स्वच्छ सर्वेक्षण लीग २०२० स्पर्धेची तयारी सुरू झाली. यासंदर्भातील तयारीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त संजय काकडे यांच्या उपस्थितीत बुधवारी स्थायी समिती बैठक पार पडली.

ठळक मुद्देमनपा सभागृहात आढावा बैठक : आयुक्तांनी दिल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : १२ जून २०१४ पासून सुरु झालेल्या स्वच्छता मोहिमेत चंद्र्रपूर शहर सहभागी झाले. यामध्ये उत्कृष्ट कामगिरीही केली. आता स्वच्छ सर्वेक्षण लीग २०२० स्पर्धेची तयारी सुरू झाली. यासंदर्भातील तयारीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त संजय काकडे यांच्या उपस्थितीत बुधवारी स्थायी समिती बैठक पार पडली.स्वच्छ सर्वेक्षण लीग २०२० च्या अनुषंगाने सेवा पातळीवरील प्रगती, थेट निरीक्षण, नागरिकांकडून प्रतिसाद आणि प्रमाणीकरण यासंदर्भात जे नवीन निकष शासनातर्फे लागू केले गेले आहेत. त्यादृष्टीने मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांनी कशी तयारी करावी, यासंदर्भात आयुक्त काकडे यांनी मार्गदर्शन केले.मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात शहराने विदभार्तून प्रथम, महाराष्ट्रातून तिसरा तर संपूर्ण देशातून २९ वा क्रमांक पटकाविला होता. एवढेच नाही तर ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये (मध्यम शहर) नागरिकांच्या प्रतिक्रिया (सिटीझन फीडबॅक) या घटकात चंद्रपूर शहराने देशातून प्रथम क्रमांक पटकाविला होता.स्वच्छ सर्वेक्षण २०२० हे स्वच्छ सर्वेक्षणाचे हे पाचवे वर्षे आहे. देशाच्या शहरी भागातील स्वच्छता परिणामांची सातत्यपूर्णता सुनिश्चित करण्यासाठी यंदा सर्वेक्षण शेवटी न करता दर तीन महिन्याला करण्यात येणार आहे. एप्रिल ते जून, जुलै ते सप्टेंबर, आॅक्टोबर ते डिसेंबर २०१९ असे तीनदा स्वच्छताविषयक कामांचे मूल्यमापन केले जाणार आहे. शहरातील सार्वजनिक स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी नगरविकास मंत्रालयाने २०१४ मंधे स्वच्छ सर्वेक्षणाची सुरवात केली होती.देशपातळीवरील हे सर्वेक्षण नावीन्यपूर्ण पद्धतीने व विहित कालमर्यादेत पार पाडण्यात येते. नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.निकोप स्पर्धेला उत्तेजनशहरे अधिक स्वच्छ तसेच नागरी संस्थांतर्फे दिल्या जाणाºया सेवांच्या दर्जामध्ये सुधारणा करून शहरांमध्ये निकोप स्पर्धेला उत्तेजन देण्यात येणार आहे. यावेळी उपायुक्त गजानन बोकडे, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, शितल वाकडे, सचिन पाटील, शहर अभियंता महेश बारई, मुख्य लेखाधिकारी मनोज गोस्वामी, वैद्यकीय अधिकारी स्वच्छता नितीन कापसे व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान