शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंनी घेतला विद्यार्थ्यांचा वर्ग

By admin | Updated: July 27, 2016 01:20 IST

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंह यांनी पंचायत समिती, भद्रावती क्षेत्रांतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा

भद्रावती तालुक्यातील अनेक गावांना भेटी : विकास कामांची केली पाहणी भद्रावती : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंह यांनी पंचायत समिती, भद्रावती क्षेत्रांतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा तिरवंजा (मोकासा) येथे भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्येक वर्गातील मुलांच्या गुणवत्तेविषयक वाचन, लेखन, घेऊन अभ्यासक्रमाबाबत विचारणा केली. तसेच शैक्षणिक व सामान्यज्ञानावर चर्चा केली. या भेटीदरम्यान शाळा इमारत, डिजीटल कक्ष, स्वयंपाकघर व शौचालय इत्यादीची पाहणी केली व शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना आवश्यक मार्गदर्शन करून शाळेमध्ये पुन्हा काय सुधारणा करता येईल, याबाबत सूचना दिल्या. शाळेच्या आवारात भाजीपाला घेऊन, त्याचा वापर शालेय पोषण आहारात करावा, अशा सूचनाही दिल्यात. शौचालयाचा महत्त्व पटवून शौचालयाचा वापर करण्याविषयी मुलांना आवाहन केले. भेटीदरम्यान मुख्याध्यापिका अल्का ठाकरे व शिक्षकवृंद उपस्थित होते. त्यानंतर ग्रामपंचायत घोडपेठला भेट दिली. या भेटीत ‘आमचा गाव आमचा विकास’ अंतर्गत सुरू असलेल्या शुन्य ते तीन दिवस या कार्यक्रमास भेट दिली. तसेच या कार्यक्रमाच्या सर्वसमावेशन आराखड्याला मान्यता देण्याबाबत ग्रामसभेला भेट दिली. यावेळी ग्रामसभेला संबोधित करताना, ‘आमचा गाव, आमचा विकास’ या योजनेची रुपरेषा समजावून सांगितली. गावकऱ्यांना स्वच्छतेविषयक महत्त्व पटवून देत शौचालयाचा नियमित वापर करावा, असे आवाहन केले. गावात सर्व योजना घेऊन गाव समृद्ध करावे अशा सूचनाही ग्रामस्थांना केल्या. ग्रामसभेला शंभरहून जास्त नागरिकांची उपस्थिती होती. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र घोडपेठ येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांसोबत चर्चा केली. त्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुख सोईबाबत विचारणा करून प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व खोल्याची पाहणी केली. त्यानंतर उपलब्ध औषधांच्या साठ्याची सुद्धा पाहणी केली व अडचणी सुद्धा जाणून घेतल्या. रुग्णांना आवश्यक त्या सुख-सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून रुग्णांची गैरसोय होणार नाही, याबाबत अधिकारी डॉ. अवताडे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मेश्राम यांना सूचना दिल्या. भेटीदरम्यान गटविकास अधिकरी संदीप गोडशेलवार, गटशिक्षणाधिकारी अरुण काकडे, गावचे सरपंच, ग्रापंचायत सदस्य तथा ग्रामसेवक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)