शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

दारू पकडण्यासाठी सिटी पोलिसांची ‘सर्च’ मोहीम

By admin | Updated: February 14, 2017 00:38 IST

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधावर शहर पोलिसांनी जमनजट्टी दर्गा मागील मोकळ्या जागेवर दारूसाठा शोधण्यासाठी तीन तास सर्च मोहीम राबवली.

तीन तास शोध : सहा लाख ४० हजार रुपयांचा दारुसाठा जप्तचंद्रपूर : पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधावर शहर पोलिसांनी जमनजट्टी दर्गा मागील मोकळ्या जागेवर दारूसाठा शोधण्यासाठी तीन तास सर्च मोहीम राबवली. पोलिसांनी तब्बल एक किलोमीटरचा परिसर पिंजून काढून सहा लाख ४० हजार रुपये किंमतीचा दारूसाठा जप्त केला. ही कारवाई शनिवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली.पोलिसांनी जिल्ह्यात अवैध दारुविक्रेत्यांवर कारवाईची मोहीम सुरु केली आहे. त्यानुसार चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यातंर्गत पठाणपुरा गेटबाहेरील जमनगट्टी दर्गामागील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात दारूसाठा लपवून असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच ठाणेदार सुनील ताजणे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोधपथकाचे प्रमुख राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वातील पथक घटनास्थळी दाखल झाले. दारु शोधण्यासाठी सदर परिसरात तीन तास सर्च मोहीम राबविण्यात आली. यावेळी एका ठिकाणी देशी दारूच्या ३६ पेट्या पोलिसांना लपवून असलेल्या आढळल्या. पोलिसांना दारूसाठा जप्त केला असून जप्त केलेल्या दारूची किंमत सहा लाख ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र पोलीस जाण्यापूर्वीच दारुविक्रेते घटनास्थळावरुन पसार झाले. त्यामुळे पोलिसांना दारूसाठा घेऊनच परतावे लागले. तसेच चंद्रपूर शहर पोलिसांनीच केलेल्या दुसऱ्या कारवाईत एक लाख १० हजार रुपये किंमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई लालपेठ परिसरातील वाघोबा मंदिराजवळ करण्यात आली. दुचाकीसह आरोपीला अटक करून लाख रुपये किंमतीची दारू पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस अधीक्षक संदीप दीवाण, अपर अधीक्षक हेमराजसिंग राजपूत, एसडीपीओ सुशीलकुमार नायक, ठाणेदार सुनील ताजने यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वातील पोलीस उपनिरीक्षक विवेक देशमुख, प्रभूदास माऊलीकर, सुरेश केमेकर, किशोर तुमराम, अफसर पठाण, दिलीप चौधरी, संजय आतकुलवार, अमोल गिरडकर, किशोर वैरागडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या अवैध दारूवर प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी धरपकड मोहीम राबविली असून, दारूविक्रेत्यांना जेरबंद केले जात आहे. त्यामुळे दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. (नगर प्रतिनिधी)निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाईजिल्ह्यात सद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा माहोल सुरू आहे. या माहोलमध्ये रंग भरण्यासाठी उमेदवाराकडून दारूचा वापर केला जाण्याची शक्यता असल्याने मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दारूची तस्करी होत आहे.