शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक संस्थांवर नगरपरिषदेचा कर ; पटसंख्येअभावी बंद असलेल्या शाळेवरही लावला भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 13:14 IST

Chandrapur : जुन्या व मोडकळीस आलेल्या वास्तू उभ्या आहेत तरीही त्या शाळांवर कर आकारणी

दत्तात्रय दलाल लोकमत न्यूज नेटवर्क ब्रह्मपुरी : तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रह्मपुरी शहरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निर्माण करण्यात आल्या. त्यावेळी उच्च श्रेणी प्राथमिक शाळा असे नामकरण करण्यात आले होते. त्याच शाळांवर नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर कर आकारणी करण्यात येत आहे. त्यामुळे सदर शाळा (शासकीय) जिल्हा परिषदेच्या असून, त्यांच्यावर कर आकारणी कशी काय करण्यात येत आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. 

ब्रह्मपुरी शहरात स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक उच्च श्रेणी प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या. सध्या शहरात एकूण नऊ प्राथमिक शाळा व एक गट साधन केंद्र आहे. त्यात कुर्झा, बोंडेगाव येथे प्रत्येकी एक शाळा तर शहरात १ ते ५ क्रमांकाच्या पाच शाळा आहेत. 

एक लाखावर कर देलनवाडी येथे एक जि.प. प्राथमिक शाळा तर जिल्हा परिषद मुलींची प्राथमिक शाळा जाणी वॉर्ड येथे अस्तित्वात आहे. शिवाय उदापूर जिल्हा परिषद हायस्कूल जवळ गट साधन केंद्र आहे. या सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांवर नगर परिष- देकडून कर आकारणी करण्यात येत आहे. सदर एकूण कर आकारणी १ लाख १३ हजार ९७५ रुपये एवढी असून, पंचायत समिती मार्फत सदर कर नगर परिषदेकडे भरण्यात येते. 

पटसंख्येअभावी बंद शाळांवरही कराची आकारणी 

  • पटसंख्येअभावी दोन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन दुसऱ्या शाळेत करण्यात आले आहे. त्यात जी. प. प्राथमिक शाळा क्र. ३ व जिल्हा परिषद मुलींची शाळा जाणी वॉर्ड या दोन शाळांचा समावेश आहे. 
  • केवळ जुन्या व मोडकळीस आलेल्या वास्तू उभ्या आहेत तरीही त्या शाळांवर कर आकारणी करण्यात येत आहे.

"ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत दोन्ही ग्रामविकास मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे ग्रामपंचायत त्यांच्या हद्दीतील प्राथमिक शाळांकडून कर घेत नाही. तर नगरपरिषद क्षेत्र हा नगरविकास मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे नगरपरिषद क्षेत्रातील शाळांच्या इमारतींवर कर आकारणी करण्यात येते. पुढे नियमात बदल करण्यात आला व शासकीय जिल्हा परिषद शाळांवर कर आकारणी करण्यात येऊ नये, असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले तर त्या शाळा कर आकारणीतून वगळण्यात येतील." - अर्थिया जुही, मुख्याधिकारी, नगरपरिषद, ब्रह्मपुरी 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाchandrapur-acचंद्रपूर