फोटो
बल्लारपूर : नाताळचे औचित्य साधून बल्लारपूर नगर परिषदेच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरील विजेच्या खंब्यावर शुक्रवारी मयूर लॅम्पचा झगमगाट करून नागरिकांना नाताळाच्या शुभेच्या दिल्या. नगर परिषदने लावलेले मयूर लॅम्प मुंबईच्या मरीन ड्राइव्ह व एयर पोर्ट लेननंतर एकमेव बल्लारपूर शहरात आहे.
जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून बल्लारपूर शहराची ओळख आहे. तसेच माजी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून बल्लारपूर शहरात मागील पाच वर्षाच्या काळात आमूलाग्र बदल घडवून आणले. सद्यस्थितीत बल्लारपूर शहराचे सौदर्य खुलावे म्हणून राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांचे प्रतिकृती असलेले मयूर लॅम्प राज्य महामार्गावर व वस्ती विभागातील दुभाजकावर असलेल्या विद्युत खांबावर लागले आहे. यामुळे बल्लारपूर शहराच्या सौदर्यात आणखी भर पडली आहे. नगर परिषदचे अभियंता महेश वानखेडे यांनी सांगितले की वैशिष्ठपूर्ण निधीतून ही अनोखी रोषणाई करण्यात आली असून ती रात्रीच्या वेळेस सतत सुरु राहणार आहे.
कोट
मुंबईच्या मरीन ड्राइव्ह व एयरपोर्ट लेनच्या मार्गावर मयूर लॅम्पचे दृश्य बघून मला वाटले की अश्या दिव्याच्या प्रकाशाने बल्लारपूरलाही सुशोभित करू. त्यानंतर तसा संकल्प केला व आज तो पूर्ण झाला. कोविडमुळे हा प्रकल्प लांबला, पण ख्रिसमसचा मुहूर्त पाहून शुभारंभ केला.
- हरीश शर्मा, नगराध्यक्ष, बल्लारपूर.
बल्लारपुरातील मुख्य मार्गावर लागलेले मयूर लॅम्प
- मंगल जीवने