शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

साथीच्या आजाराने नागरिक बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 06:00 IST

वातावरणात सतत बदल होत असताना प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला या वातावरणात जुळवून घेणे सहज शक्य होत नाही. लहान बालके, वृद्ध व रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना आजाराची लवकर लागण होते. रात्री थोडी थंडी व दिवसा उकाडा, त्यातच अधून मधून पावसाच्या सरी अशा वातावणामुळे साथीचे आजार बळावत आहे.

ठळक मुद्देवातावरणात बदल : उबदार कपड्यांची मागणी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून वातावरण सातत्याने बदलत आहे. कधी थंडी तर कधी कोरड्या वाऱ्यांमुळे विविध आजारांनी डोके वर काढले आहे. ऐन दिवाळीच्या दिवसात व्हायरल फीवर आणि सर्दी-खोकल्यांच्या तक्रारी वाढल्या असतानाच साथीचे आजारही वाढत आहेत. घरोघरी सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण आढळून येत आहे. परिणामी, शासकीय रुग्णालयासह खासगी दवाखानेही फुल्लं झाले आहेत. अनेक नागरिकांची दिवाळीही आजारपणातच गेली.वातावरणात सतत बदल होत असताना प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला या वातावरणात जुळवून घेणे सहज शक्य होत नाही. लहान बालके, वृद्ध व रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना आजाराची लवकर लागण होते. रात्री थोडी थंडी व दिवसा उकाडा, त्यातच अधून मधून पावसाच्या सरी अशा वातावणामुळे साथीचे आजार बळावत आहे. वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य आजारातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहावयास मिळते. आधीच श्वसनाचे विकार असणाºया व्यक्तींना या वातावरणाचा अधिक त्रास होतो. गावागावांतील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये व खासगी दवाखाने रुग्णांच्या संख्येमुळे भरल्याचे चित्र आहे.सर्दी-पडसा, खोकला व त्यामुळे आलेल्या तापावर वेळीच उपचार न केल्यास ताप वारंवार येतो. परिणामी, अनेकदा रुग्णांना जीवही गमवावा लागतो. यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. यासाठी आरोग्याप्रती जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.मागील काही दिवसांपासून व्हायरल फिवरने कहर केला आहे. प्रत्येक घरातील बालके आजारी दिसून येत आहे. सर्दी, खोकला, ताप आणि घसा दुखत असल्याने चिमुकल्यांची त्राही होत असल्याचे दिसते. ग्रामीण भागातही विविध आजारांची डोके वर काढले असून नागरिक जेरीस आले आहेत.मच्छरदाणीत झोपणे फायद्याचेया वातावरणात मच्छरांची उत्पत्ती अधिक होते. त्यामुळे डासांपासून बचाव व्हावा यासाठी मच्छरदाणीत झोपणे फायद्याचे ठरते. सर्दी, पडसा, खोकला झाल्यास वेळीच डॉक्टरांच्या सल्लाने औषधोपचार करावा.त्वचा कोरडी व्हायला सुरुवातथंडीमध्ये कोरडी हवा श्वासोच्छवासाद्वारे आत जाते व याचा परिणाम फुफ्फुसावर होतो. थंडीमुळे घसा खवखवणे, घशाचा संसर्ग असे आजार होतात. यापासूनच श्वसनाच्या आजाराची सुरुवात होते. दम्याच्या रुग्णांना या वातावरणाचा अधिक त्रास होतो. अशा प्रतिकूल परिस्थितीत वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. नियमित फिरायला जाणे, व्यायाम करणे, एकाच वेळी न खाता थोडे-थोडे चार ते पाच वेळा खाणे, रोज तीन ते चार लिटर पाणी पिणे, रोज एक फळ वा सुका मेवा खाणे आवश्यक असल्याचे डॉक्टरचे म्हणणे आहे. अधिक वेळा उपाशी राहणे या काळात अपायकारक ठरते. यामुळे नियमित सकस आहार घ्यावा तसेच हात, पाय स्वच्छ धुण्याच्या सूचनाही वैद्यकीय तज्ज्ञांनी दिल्या आहे.

टॅग्स :Healthआरोग्य