--
धुळीमुळे श्वसनाचे आजार बळावले
भद्रावती : माजरी मार्गावरून मोठ्या प्रमाणावर कोळशाची वाहतूक केली जात आहे. अनेक वाहने उघड्यावर कोळशाची वाहतूक करीत असल्याने या रस्त्यावर कोळशाच्या धुळीचा थर साचतो. त्यामुळे वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत असून अनेकांना श्वसनाचे त्रास वाढत आहे. त्यामुळे या धुळीवर नियंत्रण आणावे,अशी मागणी केली जात आहे.
---
शालेय वेळेत बस सोडण्याची मागणी
कोरपना : गडचांदूरमध्ये अनेक शैक्षणिक संस्था, शाळा व महाविद्यालय आहेत. या शाळा , महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून विद्यार्थी जातात. कोरोना संकटामुळे अद्यापही पूर्ण क्षमतेने बस सुरु नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर बसेस उपलब्ध होत नसल्याने तासिकेपासून वंचित राहावे लागत आहे. तसेच काहीवेळा बस न मिळाल्याने घरी परत यावे लागते, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.