शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
3
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
4
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
5
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
6
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
7
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
8
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
9
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
10
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
11
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
12
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
13
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
14
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
15
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
16
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
17
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
18
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
19
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
20
Crime: विधवा वहिनीच्या बेडरूममध्ये घुसून दीराचं घाणेरडं कृत्य, गुन्हा दाखल!

पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती

By admin | Updated: April 27, 2016 00:53 IST

औद्योगिक तालुका म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालक्यामध्ये अनेक गावात पाणी टंचाई दिसून येत आहे.

पाणी पुरवठा समित्या कागदावरच : मुदत संपूनही कंत्राटदारांनी केले नाही कामनांदाफाटा : औद्योगिक तालुका म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालक्यामध्ये अनेक गावात पाणी टंचाई दिसून येत आहे. तालुक्यातील कोट्यवधीच्या पाणीपुरवठा योजना अपयशी ठरल्याने पाण्यासाठी गावकऱ्यांना वणवण भटकंती करावी आहे. याचबरोबर तालुक्यात १९९८ मध्ये ५३ गावांसाठी सुरू झालेली पाणी पुरवठा योजना नांदा व गडचांदूर वगळता इतर गावात अपयशी ठरली आहे. कित्येक वर्षांपासून पाईपलाईन दुरुस्ती न झाल्याने गावात पाणीच मिळत नसल्याचा प्रकार दिसत आहे. शासनाने गावातील पाणी टंचाई निवारण्यासाठी गावपातळीवर पाणी व्यवस्थापन समित्या नेमण्याचे ग्रामपंचायतीला याआधीच निर्देश दिले आहे. या समितीला निविदा काढणे, पाणी परीक्षण करणे, खर्चाची मंजुरी देणे, कंत्राटदार नेमणे, नळयोजनेचे काम आदी अधिकार देण्यात आले आहे. मात्र काही गावांमध्ये सोयीच्या कंत्राटदाराला कंत्राट दिले आहे. त्यामुळे मुदत संपूनही काम पूर्ण झाले नसल्याचे चित्र दिसते. तालुक्यात कोडशी (खुर्द), शेरज, माथा, कुकडबोरी, कातलाबोडी, लखमापूर, गडचांदूर, हातलोणी, कवठाळा, कान्हाळगाव, मांडवा आदी गावांमध्ये पााणी टंचाईची झळ अधिक आहे. काही गावांमध्ये एकाच कामासाठी चारचार योजनेतून काम करण्यात आले. यात लाखो रुपये खर्च करुनही गावकऱ्यांना पाणी मिळाले नाही. हा प्रकार आदिवासी वस्ती असलेल्या मांगलहिरा येथे दिसून येते. त्याचबरोबर सन २०१३-१४ मध्ये सौरपंपावर आधारित नळयोजना व विविध गावांमध्ये फिल्टर मशीन बसविण्यात आल्या. मात्र एकदा बिघडलेल्या सौरपंपाकडे व फिल्टर मशीनकडे कुणीही ढुंकून पाहले नाही. त्यामुळे ही योजनाही यशस्वी ठरली नाही. यातील पाकडहिरा हे गाव वगळता कान्हाळगाव, तानबाडी कोडशी या गावात योजनेला यश आले नाही. परिणामी ााणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)अमलनाल्याचे पाणी कंपनीच्या घशातसध्या माणिकगड सिमेंट कंपनीच्या अंतर्गत येणाऱ्या लखमापूर, गडचांदूर या गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या आहे. सदर गावे माणिकगड सिमेंट कंपनीलगत आहे. मात्र या गावांना कंपनीकडून पाणी पुरवठा होत नसल्याचेही दिसते. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी घेता यावे, यासाठी अंमलनाला व पकडीगुड्डम धरण बांधण्यात आले. यातील उपलब्ध पाण्याचा मोठा साठा सिमेंट कंपन्या उपसा करीत आहे. मात्र दत्तक गावातील पाणी टंचाई निवारण्यासाठी प्रयत्नही होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. धरणाच्या पाण्यावर स्वत:चे वीज प्रकल्प चालविताना नागरिकांच्या हक्काचे पाणी कंपन्या घेत आहे. मात्र गावात पाणी टंचाई निवारण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, ही शोकांतिका आहे. तेव्हा लोककल्याणासाठी वापरण्यात येणारा माणिकगड सिमेंट कंपनीचा सीएसआर निधी जातोय कुठे, असा सवाल भाजपा नेते आबीद अली यांनी केला आहे