शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सोनेगाव बेगडेतील दूषित पाण्याने नागरिकांना आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:00 IST

चिमूर नगर पालिकेअंतर्गत येणाऱ्या सोनेगाव बेगडे येथे पिण्याच्या पाण्याच्या नळाला गढूळ पाणी येत असून ते पाणी पिल्याने गावातील अनेकांना विविध आजाराची लागण झाली आहे. हगवण, उलट्याचा त्रास वाढल्याने गावातील काहींना चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये भीती : शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर: चिमूर नगर पालिकेअंतर्गत येणाऱ्या सोनेगाव बेगडे येथे पिण्याच्या पाण्याच्या नळाला गढूळ पाणी येत असून ते पाणी पिल्याने गावातील अनेकांना विविध आजाराची लागण झाली आहे. हगवण, उलट्याचा त्रास वाढल्याने गावातील काहींना चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी नागगरिकांनी केली आहे.यावर्षी चिमूर येथे पाण्याची पाण्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे. पालिकेच्या हद्दीत येणाºया सोनेगाव बेगडे येथील पिण्याच्या पाण्याचे नळाला काही दिवसांपासून गढूळ पाणी येत होते. तर काही नळांना मातीचा गाळही येत होता. अशा परिस्थितीत नागरिकांनी ते पाणी पिल्याने नागरिकांना हगवण, उलट्यांचा त्रास होऊ लागला. हा त्रास वाढल्याने येथील शोभा जयगोपाल पिंपळकर, गजानन शत्रुघ्न नन्नावरे, डोमा गजीक, अर्जून कमलाकर नन्नावरे, सपना सचिन नन्नावरे, नामदेव चौधरी, गिरीधर नन्नावरे, रोहन चिंधुजी ढोणे, सुमित चिंधूजी ढोणे, माधुरी भास्कर ढोणे यांच्यासह गावातील १५ नागरिकांना चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यातील काहींना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गावातील विहिरी व नळाच्या पाण्याचे नमुन्यांची तपासणी केली असता, ते पाणी पिण्या योग्य नसल्याचे आढळून आल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पिण्यासाठी पाणीच मिळत नसल्याने आम्ही कुठले पाणी प्यायचे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.दरम्यान, गावात दवंडी देऊन विहिरीचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे सांगण्यात आले होते. या विहिरीच्या पाण्याचा वापर पिण्यास करू नका, सार्वजनिक नळाच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करा, असे सांगण्यात आले होते. परंतु नळालासुद्धा दूषितच पाणी येत असल्याने कुठले पाणी प्यायचे, हा मोठा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे.नगर परिषद प्रशासन या बाबींची दखल घेत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. गावात आजाराची लागण झाल्याने गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.विहिरीच्या उपशाकडे प्रशानाचे दुर्लक्षसध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. यापूर्वीच जर प्रशासनाने उपाययोजना केली असती तर आज ग्रामस्थांवर ही वेळ आली नसती.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई