शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
5
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
6
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
7
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
8
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
9
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
10
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
11
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
12
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
13
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
14
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
15
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
16
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
17
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
18
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
19
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!

नागरिकांच्या गर्दीने आनंदोत्सव बहरला

By admin | Updated: September 3, 2015 00:35 IST

चंद्रपुरात सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालाच्या शुभारंभाची घटना चंद्रपूरकरांसाठी स्मरणात राहील अशी ठरली.

वैद्यकीय महाविद्यालयाचा शुभारंभ : नरेश पुगलियांच्या पुढाकारात गांधी चौकात जल्लोषचंद्रपूर : चंद्रपुरात सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालाच्या शुभारंभाची घटना चंद्रपूरकरांसाठी स्मरणात राहील अशी ठरली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात जिल्हा मजदूर काँग्रेस कमेटीसह विविध सामाजिक संघटनांनी नागरिकांसाठी केलेले ५६ भोग मेजवानीचे आयोजन, सत्कार समारंभ आणि रात्री रंगलेला दुय्यम कव्वालीचा मुकाबला यामुळे हा इव्हेंट चंद्रपूरकर जनतेसाठी अविस्मरणीय ठरला.नागरिकांचा कौल घेवून या महाविद्यालयाला ‘फुले-आंबेडकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’ असे नाव देण्यात आल्याचे जाहीर करून हा महाविद्यालयाचा नामकरण समारंभ आणि महाविद्यलय स्थापनेचा आंदोत्सव असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. स्थानिक गांधी चौकात उभारलेल्या शामियान्यात ५६ प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल नागरिकांसाठी लावण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे कटआऊट्सही नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. सायंकाळी ६ वाजता या आनंदोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या हस्ते श्री गणेशाच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून ५६ भोगचा प्रसाद चढविण्यात आला. यावेळी मंचावर युवक काँग्रेसचे नेते राहूल पुगलिया, दिल्ली काँग्रेस कमेटीचे सचिव भूपेंद्र सिंग, शहर काँग्रेस कमेटीचे गजानन गावंडे गुरूजी, गडचिरोली काँगे्रसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, युवक काँग्रेसचे पदाधिकारी अ‍ॅड. अविनाश ठावरी, चंद्रपूर जिल्हा मजदूर काँग्रेसचे महासचिव साईनाथ बुचे, जिल्हा इंटकचे अध्यक्ष पोडे, नगरसेवक प्रविण पडवेकर, अशोक नागापुरे आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या समारंभात महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचमधील सर्व विद्यार्थ्यांचा शाल-श्रीफळ आणि गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. मेडिकल कॉलेजसाठी न्यायालयात याचिका दाखल करणारे राहूल पुगलिया, प्रकाश ईटनकर आणि रामदास वागदरकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या समारंभानंतर मुंबईचे छोटा मजिद शोला आणि बनारसच्या रेहाना बेग यांच्या कव्वालीचा दुय्यम मुकाबला रंगला. तत्पूर्वी या दोन्ही कलावंतांचे पुगलिया परिवारातील नव्या पिढीतील सदस्य प्रियंका राहूल पुगलिया हिच्या सह्ते या दोन्ही कलावंतांचा सत्कार करण्यात आला. रात्री ११ वाजेपर्यंत रंगलेल्या या कव्वालीचा आनंद हजारो नागरिकांनी घेतला. चंद्रपूरकरांनी लावलेली हजेरी हे या आनंदोत्सवाचे वैशिष्ठ ठरले. चंद्रपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर होता. प्रारंभी फटाके फोडून आणि आकाशात आतिशबाजी करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. प्रचंड गर्दी असूनही समारंभ शिस्तीत आणि शांततेत पार पडला. (जिल्हा प्रतिनिधी)