शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

जमिनीच्या पट्ट्यापासून नागरिक वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:50 IST

भिवापुरातील महाकाली मंदिर वॉर्ड लक्ष्मी बजाज शोरूम समोर सुमारे ८० घरांची लोकवस्ती आहे. महाकाली नगर झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वॉर्डातील नागरिकांना अद्याप जमिनीचे पट्टे व मूलभूत सोईसुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देमहाकाली वॉर्डातील व्यथा : मनपाकडे निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भिवापुरातील महाकाली मंदिर वॉर्ड लक्ष्मी बजाज शोरूम समोर सुमारे ८० घरांची लोकवस्ती आहे. महाकाली नगर झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वॉर्डातील नागरिकांना अद्याप जमिनीचे पट्टे व मूलभूत सोईसुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, नागरिकांनी जिल्हा प्रशासन व मनपाला निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.महाकाली मंदिरासमोरील झोपडपट्टीमध्ये आदिवासी व बुरड समाजातील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. चांदा, मोहल्ला बाबूपेठ, शिट क्रमांक २, ब्लॉक क्रमांक १०४, न.भू. क्रमांक १४७५० मध्ये सुमारे सव्वा एकर क्षेत्रात हे कुटुंबीय ५० वर्षांपासून वास्तव्य करित आहेत. एका व्यावसायिकाच्या अरेरावीमुळे या दोन्ही लोकवस्तीमध्ये विकासाची कामेच झाली नाही. मनपाने प्राथमिक सोयी सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष केले. वॉर्डातील सार्वजनिक रस्ते व नाल्यांचे पक्के बांधकाम झाले नाही. त्यामुळे सर्वत्र घाण पाण्याचे डबके साचल्याचे दिसून येते. रस्त्यांची स्वच्छता व नाल्यांचा उपसा होत नाही. त्यामुळे सर्वत्र घाणी पसरली आहे. घाणीमुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. स्वच्छ भारत योजनेअंतर्गत घरगुती शौचालय बांधून देण्यात आले नाही. परिसरातील अनेक ठिकाणी कचºयाचे ढिगारे दिसून येतात. साथीचे आजार सुरू असूनही मनपाचे आरोग्य पथक लक्ष देत नाही. पिण्याचे पाणी मिळत नाही.त्यामुळे पाण्यासाठी दारोदार भटकंती सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला. सार्वजनिक दिवाबत्तीची सुविधा नाही. देखाव्यासाठी विद्युत खांब उभे आहेत. पण, त्यावर सर्व्हिस लाईन टाकण्यात आली नाही. त्यामुळे अंधार पसरलेला असतो. अंधाराचा फायदा घेऊन चोºया व महिलांची छेड काढण्याच्या घटना सतत घडत आहेत. परिसरात मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे टायफाईड, चिकन गुनिया, डेंग्यू व मलेरिया आजाराची लागण होण्याचा धोका वर्तविण्यात येत आहे. शहरात राहूनही या परिसराला जणू वाळीत टाकण्यात आले. हा प्रकार अन्यायकारक आहे. नागरिकांच्या हितासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन विविध विकासाच्या योजना राबविण्याबाबत मनपा प्रशासन उदासिन आहे. मनपा प्रशासनाकडून सातत्याने नियमित फवारणी केली जात नाही, असा आरोप निवेदनातून करण्यात आला. यावेळी टेकचंद लटरे, जगदीश उके, केदार वाघाडे, रवी शास्त्री, महाकाली वोटापल्ली, पुजा हेडाऊ, सुनिता सोनकुसरे, मलया बेडेकर, अक्षय परचाके, शालीक निमगडे, संतोष मेश्राम, शंकर गेडाम व अन्य उपस्थित होते.