शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त

By admin | Updated: October 19, 2015 01:40 IST

राजुरा तालुक्यातील देवाडा परिसरातील विजेच्या लपंडावामुळे नागरिक वैतागले आहे.

पाण्याची टंचाई : कमी-अधिक दाबामुळे वीज उपकरणात बिघाडदेवाडा : राजुरा तालुक्यातील देवाडा परिसरातील विजेच्या लपंडावामुळे नागरिक वैतागले आहे.अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या देवाडा परिसरात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे नेहमीच ये-जा सुरू असते. नागरिक विद्युत विभागाच्या भोंगळ कारभाराला कंटाळली आहे. मागील कित्येक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई भासत असून महिलांना पाण्यासाठी भटकावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच विजेच्या कमी अधिक दाब व सतत होणाऱ्या विजेचा लपंडावामुळे वीज उपकरणात बिघाड होत असून काही उपकरणे जळाल्याची माहिती आहे. विजेचा खेळखंडोबा सुरू असून नागरिकांची अनेकदा गैरसोय होत आहे.सध्या सणासुदीचे दिवस आहेत. घटस्थापना, शारदा नवरात्रारंभ, दसरा, मोहरम (ताजिया), कोजागिरी पोर्णिमा, लक्ष्मीपूजन, दीपावली, पाडवा, भाऊबीज, गुरूनानक जयंती यांच्यासह अनेक सण एका पाठोपाठ येत असून हे सण नागरिक साजरे करण्याचा मन:स्थितीत असताना रात्रंदिवस वीज खंडीत होण्याचे प्रकार देवाडासह सिद्धेश्वर, लक्कडकोट, भुर्रकुंडा, कावळगोंदी, देवापूर, भेंडवी, उमरझरा, काकळघाट, गेरेगुडा, सुकडपाली, आनंदगुडा, जगुगुडा, खिर्डी, सोनुर्ली, कोष्टाळा, घोटरा, देवाडा परिसरातील गावात घडत आहे. हा परिसर अतिदुर्गम भागात मोडत असून या भागात बहुतांश आदिवासी जमात वास्तव्याला आहे. अंधाराचा फायदा घेत जंगली डुक्कर, वन्यप्राणी शेतकऱ्यांची शेती गावालगत असल्यामुळे शेतीमध्ये हैदोस घालत आहे. तेव्हापासूनच नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मागील एका महिन्यापासून वीज पाच मिनिटे राहते तर अर्धा तास जाते. वीज किती वेळा जाते अन् किती वेळा येते, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. त्यामुळे विजेवर चालणाऱ्या व्यवसायिकांना जीवण जगणे कठीण झाले आहे. त्यातच वारंवार बंद होणाऱ्या विजेमुळे ओलीत करणारा शेतकरी वर्गसुद्धा त्रस्त झाला आहे. याकडे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. अलिकडे तर १२ तासाचे भारनियमन होत असल्याचे जाणवते. विजेवर चालणारे उद्योग धंदे प्रभावित झाले आहे. लहान आटाचक्की, कांडप केंद्र, इलेक्ट्रानिक्स वस्तु विकणारे व दुरुस्ती करणारे आदी धंदे धोक्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या परिसारतील वीज पुरवठा नसल्यासारख्याच असतो. मात्र वीज देयके तेवढेच. याबाबत अनेक वेळा नागरिक महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारतात. मात्र समाधान केले जात नाही. (वार्ताहर)