शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन जन्म दाखल्याकरिता होतेय नागरिकांची पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:58 IST

कसे होणार ? : आधार अपडेटअभावी नागरिकांचे कामे खोळंबली

शशिकांत गणवीर लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : प्रत्येक भारतीयाला आधार कार्डच्या माध्यमातून 'अद्वितीय ओळख' क्रमांक देण्यात आला आहे. ज्याला आधार क्रमांक असे म्हणतात. परंतु, आधार कार्डवर बऱ्याच नागरिकांच्या जन्मतारखेत घोळ आहे. जन्मदाखला व आधार कार्ड यामध्ये असणाऱ्या जन्मतारखा भिन्न असल्याने शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, विदेशवारी करणाऱ्यांना कागदपत्रांसाठी अडचण निर्माण होत आहे.

पूर्वी हस्तलिखित जन्मदाखला काढून आधारवरील चुकीच्या जन्मतारखेत दुरुस्ती करता यायची; परंतु, आता युआयडीआयने ऑनलाइन जन्मदाखला असल्याशिवाय आधार दुरुस्ती होणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने पालकांना आपल्या पाल्याच्या जन्मठिकाणी ऑनलाइन जन्म दाखल्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. 

टोल-फ्री क्रमांक, समाधानकारक उत्तर नाहीडिजिटल जन्मदाखला असेल, तरच आधार दुरुस्ती करणे शक्य होत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा प्रयत्न करूनही आधारकार्ड अपडेट होत नसल्याने नागरिकांची शासकीय कार्यालयीन कामे अडगळीत पडली आहेत. लाडकी बहीण योजनेपासून युआयडीमध्ये बिघाड निर्माण झाला. कुठलीही शहानिशा न करता आधार केंद्रावरून जन्मदाखले अपलोड केले. विशेष म्हणजे, केंद्र शासनाचा हा युआयडीआय उपक्रम उत्तर प्रदेशमधील एका खासगी कंपनीकडून संचालित होतो. १९४७ हा टोल-फ्री क्रमांक आहे. परंतु, समाधानकारक उत्तर मिळत नाही. 

जन्मदाखल्यासाठी आठवडाभर मुक्कामनिव्वळ जन्म दाखल्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना कोसोदूर असलेल्या शहरात आठवडाभर तळ ठोकून बसावे लागत असेल, तर त्याने जन्म दाखल्यापासून वंचित राहावे काय किंवा त्यांच्या पाल्यांनी पुढील शिक्षणाची वाट अधांतरीच सोडून द्यावी का, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. तेव्हा शासनाने जन्मस्थळ कुठलेही असो, ती व्यक्ती ज्या तालुक्यातील रहिवासी असेल, त्या तालुका प्रशासनाकडे अशा जन्माच्या नोंदी हस्तांतरीत कराव्यात, अशी मागणी ऑनलाइन दाखल्यासाठी त्रस्त झालेल्या नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

ऑनलाईन दाखला नसेल तर दुरुस्ती नाहीआता युआयडीआयने ऑनलाइन जन्मदाखला असल्याशिवाय आधार दुरुस्ती होणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने पालकांना आपल्या पाल्याच्या जन्मठिकाणी ऑनलाइन जन्म दाखल्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.

"आधार कार्डवर असलेल्या चुकीच्या जन्मतारखेच्या दुरुस्तीसाठी जन्मदाखल्याचा पुरावा घेऊन दररोज नागरिक येतात. परंतु, दाखला ऑनलाइन काढलेला असेल, तरच युआयडी पोर्टलवर अपलोड करता येतो. हस्तलिखित दाखला अपलोड होत नाही."- प्रमोद माशाखेत्री, संचालक, आधार केंद्र, मूल

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर