शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’साठी नागरिक निराधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:16 IST

आॅनलाईन लोकमतमूल: डिजिटल इंडियाचे स्वप्न बघणाऱ्या भारतात बँक खाते व इतर कामासाठी आधारकॉर्ड सक्तीचे करण्यात आले. मात्र मूल शहरात एकही आधार केंद्र देण्यात आले नाही. त्याउलट ग्रामीण भागात दोन आधार केंद्र देण्यात आले. त्यामुळे नागरिकांना आधार कॉर्ड काढण्यासाठी बाहेर जावे लागत आहे. परिणामी नागरिकांमध्ये शासनाप्रति रोष व्यक्त होत आहे.शासकीय व खासगी ...

ठळक मुद्देमूलमध्ये केंद्राची गरज : आधार कॉर्डअभावी कामे प्रलंबित

आॅनलाईन लोकमतमूल: डिजिटल इंडियाचे स्वप्न बघणाऱ्या भारतात बँक खाते व इतर कामासाठी आधारकॉर्ड सक्तीचे करण्यात आले. मात्र मूल शहरात एकही आधार केंद्र देण्यात आले नाही. त्याउलट ग्रामीण भागात दोन आधार केंद्र देण्यात आले. त्यामुळे नागरिकांना आधार कॉर्ड काढण्यासाठी बाहेर जावे लागत आहे. परिणामी नागरिकांमध्ये शासनाप्रति रोष व्यक्त होत आहे.शासकीय व खासगी कामासाठी आधार कॉर्डची सक्ती करण्यात आली. तर ३१ डिसेंबरपूर्वी आधार कॉर्ड बँक खात्याशी जोडणी न केल्यास बँक खाते बंद करण्याच्या सूचना बँकेकडून वारंवार देण्यात येत आहे. यामुळे नागरिक आधार कॉर्ड काढण्यासाठी आधार केंद्रावर जात आहेत. मात्र आधार केंद्र चालक शासनाच्या आदेशानुसार केंद्र बंद करण्यात आलेले आहे, असे सांगून परत पाठवित आहे. महाआॅनलाईन सेवेमार्फत मूल येथे पुपरेड्डीवार आणि वखरांगी ईगर्व्हनल कंपनीमार्फत रामटेके यांचे गांधी चौकात ग्राहक सेवा केंद्र सुरु होते.याआधार केंद्रामधून नागरिकांना नियमित आधार कार्ड काढण्याची सवलत होती. मात्र काही दिवसांपासून यांची सेवा शासनाने बंद केलेली आहे. तसेच शासकीय कार्यालयात आपले आधार सेंटर सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे हे दोन्ही आधार केंद्र काही दिवसांपासून बंद आहे.आजच्या स्थितीत मूल शहरात एकही आधार केंद्र नसल्यामुळे आधार कॉर्ड काढायचे कसे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.मूल तालुक्यातील मौजा चिरोली आणि फिस्कूटी येथे महासेवा केंद्र आहेत, मूल तालुक्यासाठी केवळ दोन आधार केंद्र कार्यरत असल्यामुळे याठिकाणी मोठी गर्दी असते, यामुळे शासनाने मूल शहरातही आधारकॉर्ड केंद्र सुरु करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.आधार केंद्र लवकरच सुरु करणारशासनाच्या अधिसूचनेनुसार आधार केंद्राना शासकीय कार्यालयात आपले केंद्र हलविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक नागरिकांना आधार कॉर्ड काढणे गरजेचे आहे. यामुळे मूल शहरात लवकरच आधार केंद्र सुरु करण्याच्या सूचना देणार असल्याची माहिती मूलचे उपविभागीय अधिकारी एम. व्ही. खेडीकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.