शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गोरगरिबांसाठी काँग्रेस पक्षच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:56 IST

देशात मागील ६० वर्षांपासून काँग्रेस पक्षाने सत्ता चालवून देशाची प्रगती केली. त्यात सर्वसामान्य जनतेचे हित जोपासत न्याय देण्याचे काम केले असून गोरगरीब जनतेची प्रगती उंचविण्यासाठी माजी ....

ठळक मुद्देअविनाश वारजूकर : भालेश्वर येथे कार्यकर्ता स्नेहमीलन व सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : देशात मागील ६० वर्षांपासून काँग्रेस पक्षाने सत्ता चालवून देशाची प्रगती केली. त्यात सर्वसामान्य जनतेचे हित जोपासत न्याय देण्याचे काम केले असून गोरगरीब जनतेची प्रगती उंचविण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी प्रयत्न करून न्याय देण्याचे काम केले. मात्र विद्यमान सरकारने जनहितविरोधी धोरण राबवून जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे पुन्हा काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने संघटन मजबुतीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर यांनी केले.भालेश्वर येथील कार्यकर्ता व सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, युवक काँग्रेसचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, पंजाबराव गावंडे, जि.प. गटनेते डॉ.सतीश वारजूकर, जि. प सदस्य राजेश कांबळे, जि. प. सदस्य प्रमोद चिमुरकर, जि. प. सदस्य स्मिता पारधी, महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष मंगला लोनबले, तालुका अध्यक्ष खेमराज तिडके, विजय गावंडे, पं. स. सदस्य रोशन ढोक, विजय अमृतकर, कायरकर, नेताजी मेश्राम वामन मिसार आदी उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रात सत्ता असताना महत्वाचे पदे घेतली नाही. ते जनतेच्या कल्याणासाठी झटत राहिले व आजही झटत आहेत. काँग्रेसच्या काळातील योजनांचे नावे बदलून जुन्याच योजना भाजप शासन राबवित असून जनविरोधी निर्णय घेत आहे. मात्र काँग्रेस पक्ष जणसामान्यांपर्यत पोहचून समस्या सोडवित आहे, असे सांगितले. कार्यक्रम दरम्यान जि. प. सदस्य व पं.स. सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यकर्ता स्नेहमीलन मेळाव्यात चिमूर तालुका युवक काँग्रेस तालुका अध्यक्षपदी धनराज डवले यांची नियुक्ती करून उपस्थितांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आला. यावेयी शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.रुग्णालयाची मागणीगोवरी : पाचगाव हे गाव आदिवासीबहुल गाव आहे. गावातील बहुतेक कुटुंबाकडे शेती व्यवसाय आहे. त्यामुळे गावात पशुधनाची संख्या मोठी आहे. पशुधन आजारी पडल्यास त्यांना उपचारासाठी भुरकुंडा येथे न्यावे लागते. त्यामुळे येथे पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु करण्याची मागणी आहे