शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नागपंचमीच्या बाऱ्या अन् चिमूरचा क्रांती लढा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:01 IST

१६ ऑगस्ट १९४२ चा तो नागपंचमीचा दिवस. त्यामुळे घराघरात नागपंचमीच्या बाºया बोलल्या जात होत्या. नागपंचमीच्या बाºया आणि क्रांतीच्या ज्वाला यातूनच चिमुरातील क्रांतिकारकांनी इंग्रज जुलमी अधिकारी एसडीओ डुंगाजी, नायब तहसीलदार सोनवणे व जरासंध यांचा वध केला. यासाठी तीन क्रांतिकारक शहीद झाले होते. त्यामुळे १६ ऑगस्ट १९४२ ची नागपंचमी रक्तरंजित ठरली होती.

ठळक मुद्देइंग्रज अधिकाऱ्यांचा केला होता वध : चिमूरकरांची ‘ती’ नागपंचमी झाली रक्तरंजित

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : ‘गुलामी अब नहीं होना हमारे प्रिय भारत मे, हम आझादी के लिये मर मिटेंगे, हमारे प्रिय भारत मे’ या राष्ट्रसंताच्या क्रांतिकारी भजनाचे बोल प्रत्येकाच्या कानात घुमत होते. १६ ऑगस्ट १९४२ चा तो नागपंचमीचा दिवस. त्यामुळे घराघरात नागपंचमीच्या बाºया बोलल्या जात होत्या. नागपंचमीच्या बाऱ्या आणि क्रांतीच्या ज्वाला यातूनच चिमुरातील क्रांतिकारकांनी इंग्रज जुलमी अधिकारी एसडीओ डुंगाजी, नायब तहसीलदार सोनवणे व जरासंध यांचा वध केला. यासाठी तीन क्रांतिकारक शहीद झाले होते. त्यामुळे १६ ऑगस्ट १९४२ ची नागपंचमी रक्तरंजित ठरली होती.इंग्रजाची जुलमी सत्ता भारतातून उलथवून लावण्यासाठी महात्मा गांधींनी ८ ऑगस्ट १९४२ ला मुंबई येथील ग्वालिया टॅन्क मैदानावर करा अथवा मराचा संदेश दिला. या संदेशाने तरुणांना स्फूर्ती दिली. या आदेशाने चिमूर येथील युवा क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यांसाठी गुप्त बैठका व प्रभात फेºया काढण्यास १२ ऑगस्ट १९४२ पासून सुरुवात केली. याच परिसरात वास्तव्यास असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गावागावात भजनाच्या माध्यमातून युवकांना स्वातंत्र्याविषयी प्रेरित करीत होते.१६ ऑगस्ट १९४२ ला नागपंचमीचा दिवस असल्याने घराघरात नागदेवतेची पूजा करून बाºया बोलल्या जात होत्या. अशातच सकाळी ९ वाजता गोपाळराव कोरेकार यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व प्रभातफेरी काढली. या फेरीत काँग्रेस, सेवादल व संघाचे कार्यकर्ते एकत्र आले. प्रभातफेरी जुना बसस्थानक येथे आली. तिथे ‘वाईसराय दिल्ली मे, जुते खाये गल्ली मे’ अशा घोषणा देत नागमंदिराकडे जात होती. नागपंचमीमुळे शेकडो नागरिक जमा झाले होते. मात्र काही क्रांतिकारकाच्या मनात वेगळेच होते.‘पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना’ राष्ट्रसंताच्या या भजनाने प्रेरित झालेल्या क्रांतिकारकांपैकी सेवादलाचे उद्धवराव खेमस्कर यांनी क्रांतीचा बिगुल फुंकला व सारे कार्यकर्ते अभ्यंकर मैदानावर येऊन ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देऊ लागले. तेवढ्यात पोलीस दलाने स्वातंत्र्यविरांच्या हातातील तिरंगा झेंडा हिसकावून घेतला व बारा क्रांतिकारकाना तुरुंगात डांबले. या घटनेने चिडून क्रांतिकारकांनी आपला मोर्चा इंग्रज अधिकारी डुंगाजी, सोनवाणे व जरासंध यांच्याकडे वळविला व या तिन्ही इंग्रज अधिकाºयांना यमसदनी धाडले. याच दिवशी १६ वर्षांचा बालाजी रायपूरकर, श्रीराम बिंगेवार व बाबुलाल झिरे हे शहीद झाले.पाच फण्याची नागमूर्ती देते क्रांतीची प्रेरणाचिमूर येथील क्रांतीवीर व हुतात्म्यांचे स्मरण भावी पिढ्यांना राहावे व त्यांच्या कार्यातून आजच्या युवकांना प्रेरणा मिळावी, याकरिता १६ ऑगस्ट १९५२ ला या स्मारकाचा शिलाण्यास करण्यात आला. हे हुतात्मा स्मारक लांबी, रुंदी व ऊंचीने १६ बाय १६ फूट असून त्यावर पाच फण्यांची नागदेवतेची मूर्ती आहे. त्यावर हुतात्म्यांची नावे कोरलेली आहेत.

टॅग्स :Nag Panchamiनागपंचमी