रात्री कारवाई : भूखंड व्यावसायिकांत उडाली खळबळ लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर नगर परिषदेची निर्मिती व चिमूर क्रांती जिल्ह्याच्या संभाव्य निर्मितीमुळे शहरात प्लॉट विक्रीचा व्यवसाय तेजीत आला आहे. त्यामुळे शहरात अनेक भूखंड व्यावसायिकाने आपल्या दुकानदाऱ्या थाटल्या आहेत. यात काही बनवाबनवी करून माया जमा करण्याच्या कामाला लागले आहेत. असाच एक महाभाग शहरातील वडाळा पैकू येथील बनावट कागदपत्र बनवून व ओपन स्पेसची विक्री केल्याच्या आरोपावरुन भूखंड व्यावसायिक अविनाश खाडे याला शनिवाच्या रात्री चिमूर पोलिसांनी नागपुरात बेड्या ठोकल्या. त्याच्या अटकेमुळे भूखंड व्यावसायिकांत मोठी खळबळ उडाली आहे.चिमूर शहरात लेआऊटचा व्यवसाय तेजीत आला आहे. अनेक व्यवसायिक जाहिरात बाजी व किस्तीवर भूखंड उपलब्ध करून देत आहेत. काही भूखंड व्यावसायिक लवकर श्रीमंत बनण्याचय लालसेपोटी भूखंडाचे बनावट कागदपत्र व ओपन स्पेसच्या जागेची विक्री करून ग्राहकांना फसवत आहेत. चिमूर शहरातील तलाठी साजा वडाळा पैकू १३ ब नंबर ४५९ येथील अविनाश खाडे रा. पिंपळनेरी यांनी चिमुरातील हेमंत चरपे यांना प्लॉट विक्री केले होते. त्यामध्ये ३० ते ३३ हे प्लाट ओपनस्पेस होते. खरेदीदार हेमंत चरपे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चौकशी केली त्यात महसूल विभागाने बनावट कागदपत्रे तयार केल्याचा अहवाल पोलिसांना दिला.या अहवालावरुन चिमूर पोलिसांनी भूखंड व्यावसायिक अविनाश खाडे यास नागपुरातील हुडकेश्वर येथून अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी खाडे विरुद्ध भादंवि ४२०, ४६७, ४६८ फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.२२ पर्यंत पोलीस कोठडीभूखंड व्यवसायिक अविनाश खाडेला याला रविवारी न्यायालयात हजर केले असता, २२ जुलैपर्यंत सात दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने मजुर केली. महसूल विभाग रडारवरचिमूरचा वाढता व्याप बघता शहरात अनेक भूखंड व्यावसायिक दाखल झाले आहेत. काहीजण महसुल विभाग व नोंदणी विभागाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन काम करीत असल्याने ते रडारवर आहेत.
चिमूरच्या प्लॉट विक्रेत्याला नागपुरात बेड्या
By admin | Updated: July 17, 2017 00:35 IST