शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

चिमूर-वरोरा मार्ग धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 23:08 IST

चिमूर- उमरेड ते चिमूर- वरोरा या मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणाचे बांधकाम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. यासाठी चिमूर- वरोरा मार्ग पूर्णत: खोदून ठेवण्यात आला. मात्र, पर्यायी रस्त्यावर माती टाकल्याने गिट्टी अस्ताव्यस्त झाली. या मार्गावरून वाहन चालविणे धोकादायक झाले आहे.

ठळक मुद्देगिट्टी उखडली : चौपदरीकरणाचे काम थंडावले

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर- उमरेड ते चिमूर- वरोरा या मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणाचे बांधकाम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. यासाठी चिमूर- वरोरा मार्ग पूर्णत: खोदून ठेवण्यात आला. मात्र, पर्यायी रस्त्यावर माती टाकल्याने गिट्टी अस्ताव्यस्त झाली. या मार्गावरून वाहन चालविणे धोकादायक झाले आहे.चिमूर विधानसभा क्षेत्र राष्ट्रीय महामार्गावर आले आहे. त्यामुळे चिमुरला जोडणाऱ्या उमरेड, वरोरा या राष्ट्रीय महामार्गाचे काम कंत्राटदाराकडून सुरू आहे. मात्र या रस्त्याचे काम सुरू असल्याने चिमूर वरोरा हा रस्ता खोदून ठेवला आहे. कंत्राटदाराने पर्यायी रस्ता तयार केला आहे. या पर्यायी रस्त्यावर माती व मुरूम टाकण्यात आले. अशातच पाऊस आल्याने या रस्त्यावर चिखल झाले. त्यावर उपाय म्हणून कंत्राटदाराने या रस्त्यावर गिट्टी टाकली आहे. मात्र त्यावर रोडरोलर फिरविला नाही. रस्त्यावरून वाहने जावून गिट्टी सर्वत्र विखुरली. वाहनधारकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.उमरेड- चिमूर व वरोरा मार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होण्यास आणखी बराच कालावधी लागणार आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहने धावतात. पण, रस्ता योग्य नसल्याने प्रचंड त्रास होत आहे. पावसाळ्यात अनेक अडचणी येणार असून मोठा अपघात होवू शकतो. त्यामुळे पर्यायी मार्ग मजबूत करण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.दुचाकी चालकांची कसरतरस्त्यावर माती व मुरूम टाकल्याने मोठ्या प्रमाणात घुळ पसरली आहे. त्यामुळे दुचाकीने प्रवास करताना वाहनधारकांचे हाल होतात. तोंडाला रूमाल नसल्यास चेहरा ओळखणे कठीण जाते. पाऊस आल्यानंतर चिखलात दुचाकी घसरते. दररोज या घटना घडत आहेत. मार्गावर गिट्टी टाकण्यात आली. पण ती धोेकादायक असल्याने दुचाकी कशी चालवायची, असा प्रश्न वाहनचालकांना अस्वस्थ करीत आहेत.एकाच दिवशी तीन ट्रक उलटलेचिमूर ते वरोरा मार्गावर जड वाहतुक सुरू असते. कोळसा, सिमेंट वाहतुक करणाºया वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. रस्त्यावर माती टाकल्याने शेडगाव व बोथलीजवळ एकाच दिवशी तीन ट्रक उलटल्याची घटना घडली होती.