शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

चिमूर क्रांती भूमीच्या इतिहासावर चित्रपट काढणार

By admin | Updated: August 17, 2015 00:40 IST

चिमूर स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पाहता तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या क्रांतिकारी भजनाने देशात चिमूर या गावाने सर्वप्रथम क्रांती करून स्वतंत्र झाले.

अजिंक्य देव : शहीद स्मृती दिन कार्यक्रमात सहभागचिमूर : चिमूर स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पाहता तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या क्रांतिकारी भजनाने देशात चिमूर या गावाने सर्वप्रथम क्रांती करून स्वतंत्र झाले. मी अशा भूमीच्या दर्शनाने धन्य झालो. माझ्या वडिलांची चित्रपट निर्मीती कंपनी असून या चिमूरच्या इतिहासावर आधारित तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनचरित्रावर चित्रपट काढणार असल्याची ग्वाही मराठी सिनेअभिनेता अजिंक्य देव याने येथे दिली. शहिद स्मृती दिन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमाप्रसंगी रविवारी सिनेअभिनेता अजिंक्य देव याचे येथे आगमन झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ह.भ.प. लक्ष्मणराव काळे महाराज तर उद्घाटक म्हणून आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, किरण वडेट्टीवार, अशोक चरडे, प्रफुल्ल खापर्डे, सुनिल मैद, संजय डोंगरे, माधव बिरजे, देवानंद गावंडे, पंजाबराव गावंडे आदी उपस्थित होते.यावेळी आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, या भूमीने मला मोठे केले. महाराष्ट्राचा मंत्री बनविला. या भूमीला कदापी विसरणार नाही. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी सदैव तयार असून त्यांच्या कायम पाठीशी आहे. वाघ वाचविण्याकडे सरकार लक्ष देते. परंतु शेतकऱ्याच्या दयनीय अवस्थेकडे लक्ष देत नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. आजपर्यंत ज्या शेतकऱ्याला न्याय न मिळाला नाही, त्यांच्यासाठी माझे दार खुले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा चित्रपटात चिमूरचा इतिहास समाविष्ठ करून चित्रपट निर्मितीचे त्यांनी स्वागत केले. प्रसिद्ध कीर्तनकार काळे महाराज यांनी राष्ट्रसंताना भारतरत्न देण्याची मागणी केली. राष्ट्रससंताना पडद्यावर चित्रपटाच्या माध्यमातून आणण्याची विनंती केली. प्रास्ताविक राजू देवतळे यांनी केले. संचालन सुधीर पोहनकर यांनी केले. दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. शहिदांना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. स्वातंत्र्यविरांच्या विधवा पत्नींना साडी देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)