शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांना मिरचीचा ठसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:21 IST

स्थानिक नागमंदिरातील भद्रनाग स्वामींच्या दर्शनासाठी दररोज भाविक येतात.

ठळक मुद्देनागरिकांचा आरोप : बाजाराचे स्थानांतरण करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतभद्रावती : स्थानिक नागमंदिरातील भद्रनाग स्वामींच्या दर्शनासाठी दररोज भाविक येतात. मात्र, मंदिराच्या रस्त्यावरच मिरची बाजार भरत असल्याने नागरिक व भाविकांंना प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे विक्रेत्यांचा व्यवसाय सुरू राहावा, या दृष्टीने सुरक्षित व योग्य ठिकाणी स्थानांतरण करावे, अशी मागणी केली जात आहे.भद्रावती शहराची पौराणिक शहर म्हणून ख्याती आहे. भद्रनाग स्वामींच्या दर्शनासाठी हजारो भक्त शहरात येतात. मात्र, मंदिरात दर्शनासाठी येणाºया भाविकांना दर बुधवारी मिरची बाजारामुळे हैराण व्हावे लागते. मिरची बाजारातील धुलिकणांमुळे त्रासदायक ठसका बसण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. परिणामी, भाविकांसह बालकेही हवालदील झाली आहेत. ज्या ठिकाणी मिरची बाजार भरतो, अगदी त्याच्याच मागे जिल्हा परिषद शाळा आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना मिरचीच्या धुलिकणांचा त्रास होत आहे.या बाजारातून विंजासन, गवराळा, शिवाजीनगर, सुरक्षानगर आणि अन्य वस्त्यांकडे ये-जा करणाºया नागरिकांना संकटांचा सामना करावा लागत आहे. शेकडो दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांनाही हाच जाच सुरू झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांचा त्रास लक्षात घेऊन पालिकेने मिरची बाजाराच्या स्थानांतरणाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. शहरातील चिकण, मटन व मच्छी मार्केट सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करुन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली. हाच पर्याय शहरातील प्रसिद्ध नाग मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उपलब्ध करून द्यावा.मंदिर परिसराच्या बाजुला भरणारा दर बुधवारचा मिरची बाजार अन्यत्र स्थानांतरीत केल्यास भाविक व सर्वसामान्य नागरिकांची समस्या कायमची दूर होऊ शकेल. नगर परिषद प्रशासनाने यावर विचार करावा, अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.