एक गंभीर : चंद्रपुरातील मिलन चौकातील घटनाचंद्रपूर: येथील मिलन चौकात रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास स्कार्पिओ वाहनाच्या धडकेने स्कुटीवर स्वार असलेल्या एका १४ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला, तर तिची मैत्रिण गंभीररित्या जखमी झाली.स्नेहल प्रशांत लाखे असे मृत बालिकेचे नाव असून सायंकाळी उशिरापर्यंत या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद नव्हती.मात्र पोलिसांनी अशी घटना घडल्याचे सांगितले. जखमीचे नाव मात्र कळू शकले नाही. तिच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले जाते. मृत स्नेहल स्थानिक बालाजी वॉर्डातील रहिवासी आहे.रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास स्नेहल तिच्या मैत्रिणीसोबत स्कुटीने मिलन चौकातून जात असताना एका स्कार्पिओ वाहनाने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. या अपघातात स्नेहल व तिची मैत्रिण गंभीर जखमी झाली. घटनेनंतर स्नेहलला उपचारासाठी नागपूर येथे नेत असताना वरोरानजिक तिचे निधन झाल्याचे सांगण्यात येते. स्नेहल व तिची मैत्रिण या दोघी पहाटेच्या सुमारास स्कुटी चालविणे शिकत होत्या. यावेळी स्नेहल मागे बसून होती तर तिची मैत्रिण स्कुटी चालवित होती. दरम्यान, पठाणपुऱ्यातून जटपुरा गेटकडे जाणाऱ्या मार्गावर एका स्कार्पिओने त्यांना जबर धडक दिली. सायंकाळी उशिरा माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)
वाहनाच्या धडकेने बालिकेचा मृत्यू
By admin | Updated: February 8, 2016 01:01 IST