शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

पोटच्या मुलाचा गळा दाबून खून, आरोपी पित्यानेही  केले स्वतः वर चाकुचे वार 

By राजेश भोजेकर | Updated: April 9, 2023 15:57 IST

मूल पोलिसांनी अटक करून मुलच्या उपजिल्हा रुग्णालयात त्याचेवर उपचार सुरू आहे.

चंद्रपूर : दारू पिऊन पत्नीला मारहान केल्याने पत्नी घरून निघून गेल्याने निर्माण झालेला संताप आपल्या तीन वर्षीय मुलावर काढत आपल्या पोटच्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची घटना मूल तालुक्यातील राजोली येथे आज पहाटे ५ वाजता दरम्यान घडली. प्रियांशू असे मृत बालकाचे नाव असून गणेश विठ्ठल चौधरी(३१) असे आरोपी पित्याचे नाव आहे. आरोपी गणेश यांनी देखील चाकुचे वार करून स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला होता. सध्या मूल पोलिसांनी अटक करून मुलच्या उपजिल्हा रुग्णालयात त्याचेवर उपचार सुरू आहे.

मूल तालुक्यातील राजोली येथे गणेश विठ्ठल चौधरी हा पत्नी काजल आणि मुलासह राजोली येथे राहात होता. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तो दारु पिऊन पत्नीला मारहाण केल्याने ती घरून निघुन गेली होती.घरी स्वतः गणेश आणि मुलगा प्रियांशु होते. दरम्यान रविवार ९ एप्रिल च्या. पहाटे ५ वाजता दरम्यान  दारुच्या नशेत मुलगा प्रियांशु याचा गळा दाबुन खुन केला. व स्वताच्या गळ्यावर चाकुने वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दारुच्या आहारी गेलेल्या एका पित्याने पोटच्या मुलाची गळा दाबुन खुन केल्याची घटना वाऱ्यासारखी गावात पसरली. याबाब मूल पोलिस स्टेशनला माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक सुमित परतेकी हे आपल्या पोलिस ताफ्यासह राजोली येथे पोहचून कारवाई सूरू केली आहे. आरोपी गणेश विठ्ठल चौधरी हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने त्याला मुलच्या उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आरोपी पित्याविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखला करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुमित परतेकी व चमू करीत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी