बॉक्स
पटसंख्या कमी झालेल्या मुली गेल्या कुठे
नुकत्याच उघडलेल्या शाळेमध्ये मागील दोन वर्षांच्या तुलनेत पटसंख्येत कमालीची घट झाली आहे. विशेष म्हणजे यामध्ये मुलींची संख्या अधिक आहे. त्यामुळे पटसंख्या कमी झालेल्या मुली केलेल्या गेल्या कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बॉक्स
अल्पवयीन मुलींच्या गळ्यात मंगळसूत्र
१८ वर्षांखालील मुलीचे व २१ वर्षांखालील मुलाचे लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यानंतरही काही पालकांनी आपल्या मुलींचा विवाह पार पाडला. त्यामुळे बहुतांश ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींच्या गळ्यात मंगळसूत्र दिसून येते.
बॉक्स
आर्थिक विवंचना हेच कारण
बालविवाह पार पडण्याच्या मागे विविध कारणे आहेत; परंतु, कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने अनेकांचे रोजगार हिरावले. अनेकजण बेरोजगार झाले. त्यामुळे मुलीच्या विवाहाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा विचार करत लग्न लावून देण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
कोट
मार्च २०२० पासून आतापर्यंत चार बालविवाह रोखण्यात यश आले आहे. त्यापैकी दोन प्रकरणात एफआयआर दाखल झाली आहे. मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी व मुलाचे २१ पेक्षा कमी असणाऱ्यांचे लग्न लावणे कायद्याने गुन्हा आहे. असे प्रकार जर दिसून येत असल्यास जिल्हा बालसंरक्षण कक्ष किंवा १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून माहिती द्यावी.
अजय साखरकर,
जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, चंद्रपूर