शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

बल्लारपूर पेपर मिल समस्येवर मुख्यमंत्री गंभीर

By admin | Updated: November 13, 2016 00:37 IST

बल्लारपूर पेपर मिलची आज सर्व बाबतीत वाईट स्थिती झाली आहे.

तूर्त चर्चा : नागपूर हिवाळी अधिवेशनात तोडगा काढण्याचे संकेतबल्लारपूर : बल्लारपूर पेपर मिलची आज सर्व बाबतीत वाईट स्थिती झाली आहे. या मिलला, कच्चा माल बांबूचा तुटवडा भासत आहे त्यामुळे उत्पादन ठप्प आहे. या विषयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गंभीर असून त्यांनी या विषयाशी संबंधित मंत्री, अधिकारी, मिल व्यवस्थापन आणि कामगार प्रतिनिधी यांची बैठक बोलावून त्यावर चर्चा केली. बांबू पुरवठ्याचा प्रश्न नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी व्यवस्थापन तथा कामगार प्रतिनिधींना मुंबई येथे वर्षा बंगल्यावर दिले.या बैठकीला वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, कामगार आयुक्त यशवंत केरूरे, सहायक कामगार आयुक्त अनिल लासटवार, व्यवस्थापनाकडून पेपर मिलचे मुख्य प्रशासकीय अधिकारी निहार अग्रवाल, असोसिएट वाईस प्रेसिडेंट (मानव संसाधन) रणजी अब्राहम, बिल्ट बल्लारपूरचे मुख्य महाव्यवस्थापक व्यंकटेशरलू, जनसंपर्क अधिकारी नरेंद्र रावेल आणि बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेकडून महासचिव वसंत मांढरे, उपाध्यक्ष तारासिंग, अ‍ॅड. अविनाश ठावरी आदी उपस्थित होते. आर्थिक संकट आणि कच्चा मालाभावी मिल उत्पादन बंद असल्यामुळे कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन, सुपर बोनस, एलटीए आदींचे सुमारे ३८ कोटी ५० लाख रुपये थकीत आहेत. या समस्या व्यवस्थापन आणि कामगार नेत्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडल्या. पेपर मिल व्यवस्थापनाने नेहमीप्रमाणे बांबूकरिता निविदा भरल्या. परंतु त्याचे पुढे काय झाले, याचे लिखित उत्तर वन विभागाने दिलेले नाही. वन विभागाकडून पेपर मिलची अडवणूक केली जात आहे, अशी तक्रार त्या बैठकीत करण्यात आली. हे सारे ऐकून घेऊन, पेपर मिल मजदूर सभेने मे महिन्यात, बांबूच्या मागणीकरिता उपोषण करताना, मुख्यमंत्र्याशी सभेचे अध्यक्ष नरेश पुगलिया यांनी चर्चा केली होती. त्यावेळी दिलेल्या आश्वासनाचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी, वन विभागाची पडिक जमीन पेपर मिलला बांबूचे उत्पादन करण्याकरिता दिली जाईल, असे सांगितले. शासनाने ‘पेसा’ कडून बांबू विकत घ्या, असे बजावले आहे. मात्र, त्यात बऱ्याच अडचणी येत आहे. म्हणून, आजवर वन विभागाकडून ज्या पद्धतीने मिलला बांबू देण्यात येत होता, त्याच पद्धतीने बांबू देण्याची सोय व्हावी, अशी विनंती करण्यात आली. सध्या नगर पालिकांच्या निवडणुका आहेत. आचार संहितेमुळे ठोस आश्वासन देता येत नाही. निवडणुका संपून आचारसंहितेनंतर त्यावर नेमका मार्ग काढू, असे मुख्यमंत्री शेवटी म्हणाले. ही माहिती पत्रपरिषदेत वसंत मांढरे यांनी दिली. तसेच पेपर मिल विकत घेण्यासाठी जे.के.सोबत सुरू असलेल्या वाटाघाटी फिस्कटल्या आहेत. आता थापर समूहच मिल चालविणार व २०१७ ला स्थिती पूर्ववत येणार, असे मांढरे यांनी ठासून सांगितले. या पत्रपरिषदेत तारासिंग, रामदास वागदरकर, वीरेंद्र आर्य उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)