भद्रावती : पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर व गोंडवाना इंटरप्राजेस धानोलीच्या संयुक्त विद्यमाने धानोली येथील कौस्तुभ पोल्ट्री फार्म येथे चिकन मेळावा जनजागृती कार्यक्रम पार पडला.
विदर्भ पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजा दुधबळे, प्रा. डॉ. मुकुंद कदम, डॉ. सुरेंद्र राऊत, डॉ. युसुफ शेख, डॉ. मत्ते, पंचायत समिती सभापती प्रवीण ठेंगणे, जि. प. सदस्य अर्चना जिवतोडे, बॅक व्यवस्थापाकक झा, डॉ. नंदकिशोर मैंदळकर आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. राजा दुधबळे म्हणाले, चिकन व अंडी योग्य पद्धतीने शिजवून खाल्यास इम्युनिटी वाढते. त्यामुळे संसर्गाशी लढण्याशी ताकद मिळते. प्रथिनेयुक्त अन्नाबाबत गैरसमज पसरवू नये, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. संचालन डॉ. नंदकिशोर मैंदळकर तर आभार डॉ. अनंता अकोलखेडकर यांनी केले. यावेळी तरुण सहाणी, श्यामराव गडे, राहुल विधाते आदी उपस्थित होते.