शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांकडील थकीत कृषी कर्जाची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 06:00 IST

कर्जाच्या तपासणीमुळे शेतकºयांचे खाते अपडेट होणार असून नवीन कृषी कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. खरीप व रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दरवर्षी पीक कर्ज काढावे लागते. याकरिता राष्ट्रीयीकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व विविध कार्यकारी सहकारी संस्थांना राज्य शासनाकडून उद्दिष्ट दिल्या जाते.

ठळक मुद्देलेखापरीक्षकांच्या नियुक्त्या : १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतची माहिती घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (डीसीसी) व विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीककर्ज व मध्यम मुदत कर्जाचे वितरण करण्यात आले होते. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीतील पीककर्ज, मध्यम मुदतकर्ज व पुनर्गठण झालेल्या थकीत कर्जाची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात लेखा परिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कर्जाच्या तपासणीमुळे शेतकºयांचे खाते अपडेट होणार असून नवीन कृषी कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.खरीप व रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दरवर्षी पीक कर्ज काढावे लागते. याकरिता राष्ट्रीयीकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व विविध कार्यकारी सहकारी संस्थांना राज्य शासनाकडून उद्दिष्ट दिल्या जाते. मागील चार वर्षांच्या कालखंडात जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अपवाद वगळल्यास राष्ट्रीयीकृत बँकांनी कधीही उद्दिष्टपुर्ती केली नाही. त्या तुलनेत ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या विविध कार्यकारी संस्थांनी पीक कर्ज वाटपाकडे लक्ष दिल्याचे दिसून येते. परंतु, कर्जधारक शेतकऱ्यांचे खाते अपडेट करण्यात दिरंगाई झाली.परिणामी, नवीन कर्ज मिळण्याचे मार्ग बंद झाले. त्यामुळे थकीत कर्जाची तपासणी करून अहवाल सादर करण्याची मागणी शेतकºयांनी केली. सहकार विभागालाही याचे महत्त्व पटल्याने तसा आदेश जारी करण्यात आला. त्यानुसार सहनिबंधक, लेखापरिक्षक, जिल्हा उपनिबंधक व जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग- १ यांना १७ डिसेंबर २०१९ रोजी सूचना देण्यात आल्या. हे काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.शेतकऱ्यांच्या अपेक्षाजिल्ह्यात विविध कार्यकारी सहकारी संस्थांची संख्या एक हजार पेक्षा अधिक आहे. या संस्थांचे दरवर्षी लेखापरिक्षण होते. मात्र, सहकार आयुक्तांच्या आदेशान्वये पीक कर्ज, मध्यम मुदत कर्ज व पुनर्गठण झालेल्या थकीत कर्जाचा या तपासणीत समावेश आहे. जिल्हा विशेष लेखापरिक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली. अहवाल वेळेत देण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी तपासणी करणार आहेत. ही प्रक्रिया लवकर पूर्ण झाल्यानंतर तरी पीक कर्ज व अन्य योजनांचा लाभ मिळणार का, याकडे शेतकºयांच्या लक्ष लागले आहे.सहकार आयुक्तांकडे होणार अहवाल सादरशेतकऱ्यांना १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीतील वितरित केलेल्या व ३० सप्टेंबर २०१९ अखेर थकीत कर्जाची तपासणी करण्याचे काम जिल्ह्यात सुरू करण्यात आले. सर्व विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी या कालावधीत शेतकऱ्यांना वितरीत पीककर्ज, मध्यम मुदतकर्ज व पुनर्गठण कर्जाची तपासणी केल्यानंतर सदर अहवाल सहकार आयुक्तालयाकडे सादर केले जाणार आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज