शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

स्वस्त धान्य दुकानदार कमिशनपासून वंचित

By admin | Updated: September 26, 2016 01:11 IST

मागील तीन वर्षापूर्वी शासनाने शालेय पोषण आहाराचे साहित्य पोहचविण्याचे निर्देश राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना दिले होते.

शालेय पोषण आहार : तीन वर्षांपासून प्रतीक्षावरोरा : मागील तीन वर्षापूर्वी शासनाने शालेय पोषण आहाराचे साहित्य पोहचविण्याचे निर्देश राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना दिले होते. यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना कमीशन देवू केले होते. परंतु, देयके सादर करूनही मागील तीन वर्षापासून दुकानदारांना कमीशन देण्यात आलेले नाही. त्यामुळे दुकानदारांचे लाखो रुपये मागील तीन वर्षापासून शासनाकडे थकीत आहे.मागील तीन वर्षापूर्वी शासनाने प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदारांना शालेय पोषण आहार योजने अंतर्गत येणाऱ्या शाळा व अंगणवाड्यांना पोषण आहाराचे साहित्य देण्याकरिता नेमून दिले होते. स्वस्त धान्य दुकानदार शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार प्रत्येक महिन्याला शासकीय गोदामापासून पोषण आहार साहित्यांची उचल करून साहित्य पोहचवून देत होते. यामध्ये वाहतूक, हमाली याचा खर्च व इतर किरकोळ खर्च स्वस्त धान्य दुकानदार करीत होते. या खर्चाची देयके स्वस्त धान्य दुकानदार प्रत्येक महिन्यामध्ये शासनाच्या पुरवठा विभागाकडे सादर करीत होते. एखाद्या महिन्यात शालेय पोषण आहाराचे साहित्य विलंबाने शाळेत पोहोचले तर त्याची जबाबदारी स्वस्त धान्य दुकानदाराकडे असल्याने दुकानदार या कामात हयगय करीत नव्हते. हा कार्यक्रम जवळपास दोन वर्षांपर्यंत राबविण्यात आला. सध्या शालेय पोषण आहार साहित्य पोहोचविण्याचे कंत्राट देण्यात आल्याने काही वर्षापासून दुकानदारांची सुटका झाली. परंतु तीन वर्षापूर्वी शालेय पोषण आहार साहित्य पोहोचविलेल्या दुकानदारांचे कमीशन अद्यापही शासनाने अदा केलेले नाही. एका दुकानदारांचे जवळपास ५० हजार रुपये असल्यास ही किंमत राज्यात लाखो रुपयाच्या घरात आहे. (तालुका प्रतिनिधी)