शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

वाहनाचा पाठलाग करून तस्करांना पकडले

By admin | Updated: February 6, 2017 00:40 IST

भरधाव जात असलेल्या संशयित महिंद्रा बोलेरो गाडीचा गायमुख रोडवर पाठलाग करुन पोलिसांनी दारू तस्करांना पकडले.

तळोधी (बा.) : भरधाव जात असलेल्या संशयित महिंद्रा बोलेरो गाडीचा गायमुख रोडवर पाठलाग करुन पोलिसांनी दारू तस्करांना पकडले. यात त्या वाहनातील तब्बल आठ लाख रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली व तिघांना अटक केली. ही कारवाई आज रविवारी करण्यात आली.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुक तोंडावर असताना मतदाराना खूश करण्यासाठी या मार्गाने अवैध दारु पुरवठा होत असल्याची गुप्त माहिती पोलीस विभागाला मिळाली. त्यावरून तळोधी (बा.) चे ठाणेदार विवेक सोनवणे यांनी सापळा रचून बाळापूरकडून तळोधीकडे येत असताना बोलेरो गाडीचा पाठलाग करून गाडीला अडविले. बोलेरो गाडीमध्ये देशी दारुचे १६० बॉक्स (किंमत ८ लाख रुपये) व बोलेरो गाडी (क्रमांक एमए- ३६ एफ ३१२५ ) चार लाख रुपये, असा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी जितेंद्र व्यंकट वासनिक (२८) रा. शेळी जि. भंडारा, नितेश मुखरु जांभुळे (२३) रा. कन्हाळगाव (शेळी) जि. भंडारा व सुरज नामदेवराव बगमारे (२७) रा. बोडेगाव ता. ब्रह्मपुरी या तिघांना महाराष्ट्र दारुबंदी कायदा अंतर्गत ६५ (ई) ८३ नुसार कारवाई करुन अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणेदार विवेक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय मांढरे, पोलीस हवालदार संतोष सोनटक्के, पोलीस शिपाई राहुल घुडसे, हंसराज सिंडा चांगदेव गिरडकर, शैलेश कोरे यांनी केली. (वार्ताहर) महिलांच्या मदतीने दारुतस्कर गजाआडनंदोरी : जिल्ह्यात सर्वत्र दारूबंदी असताना वणी येथून माजरी - नंदोरी मार्गाने दारुची अवैधवाहतूक होत आहे.नंदोरी येथील गाडगेबाबा चौकातून जाणारा रस्ता चंद्रपूर हायवेला जुळत असलेल्या रस्त्यावरुन मोठ्य प्रमाणात दारुची तस्करी केली जात आहे. वणीवरुन याच मार्गाने येणारी विना नंबरप्लेटची दुचाकी गतिरोधकावर आदळल्याने पिशवीतील देशी दारूच्या बॉटल खाली पडल्या. त्या उचलण्याच्या प्रयत्नात असताना चौकात कापूस भरणाऱ्या युवकांनी धाव घेऊन दारु तस्कराना पकडले. दरम्यान तस्काराचा सहकारी अजित रा. दुर्गापूर याने दुचाकी सोडून पलायन केले व घनशाम कैलास वानखेडे रा. दुर्गापूर यास महिला व युवकांनी घेराव घालून पोलीस स्टेशन वरोरा येथे सूचना दिली. पोलिसांच्या ताब्यात देत १५० देशी दारुच्या बॉटल्स व दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली.अवैध दारु विक्रेता व तस्करी याबाबत गावकऱ्यांनी पोलिसांचा खरपूस समाचार घेतला. यावर पोलीस उपनिरीक्षक मुलेपोड यांनी गावातील तंटामुक्त समिती व पोलीस पाटीलांकडून गावात दारु मिळतच नसल्याचे सांगण्यात आले आहे, अशी माहिती सर्व ग्रामस्थांना दिली.आठ दिवसता या मार्गाने होणारी अवैध दारू तस्करी व विक्री बंद न झाल्यास आम्ही चौकांमध्ये दारुचे दुकान लावू, असा इशारा नंदोरी येथील महिलांनी दिला आहे.