चंद्रपूर : मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या १३ वाहनचालकांवर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी बंगाली कॅम्प, दुर्गापूर सुमित्रानगर, बाबूपेठ व पडोली, घुग्घुस व वरोरा येथे केली. आरोपींविरूद्ध वाहनचालकांवर १८४ व १८५ मोकावा अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
रस्त्यावर वाहन ठेवणाऱ्यांवर कारवाई
चंद्रपूर : निष्काळजीपणे रस्त्यावर वाहन ठेऊन नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाºया १५ वाहनचालकांवर वेगवेळ्या ठिकाणी पोलिसांनी शुक्रवारी कारवाई केली. आरोपी हे बाबूपेठ, बंगाली कॅम्प, दुर्गापूर, रयतवारी कॉलरी व गांधी चौक परिरातील निवासी आहेत. पोलिसांनी १४ वाहनचालकांवर कलम भांदवि २८३ अन्वये गुन्हा दाखल केला.
तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा
चंद्रपूर : येथील तहसील कार्यालयात १३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या गतिमानतेवर अनिष्ट परिणाम झाला. कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कार्यालयात येतात. परंतु, कार्यालयातील महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाने यासंदर्भात राज्यशासनाकडे पाठविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
गतिरोधकाअभावी अपघातांमध्ये वाढ
चंद्रपूर : दुर्गापूर-ऊर्जानगर परिसरातून चंद्रपूर-ताडोबा मार्ग आहे. मात्र या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक बांधण्याची मागणी दुर्गापूर येथील नागरिकांनी केली आहे.
मोकळ्या जागेवर कचरा टाकल्यास कारवाई करा
चंद्रपूर :विठ्ठल मंदिर वार्डात काही ठिकाणी मोकळ्या जागेवर कचरा टाकल्या जात आहे. कचरा कुंड्या असतानाही हा प्रकार घडत आहे. मोकाट जनावरांमुळे कचरा नाल्यांमध्ये जाऊन तुडुंब भरल्या आहेत. घाणीमुळे रोगराई पसरू शकते. त्यामुळे मनपाने स्वच्छता कर्मचाºयांना तातडीने वार्डात पाठवावे व रस्त्यावर कचरा टाकणाºयांवर कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली आहे.
नवरगाव-सिंदेवाही रस्त्यावर खड्डे
सिंदेवाही : नवरगाव ते सिंदेवाही रस्ता अरुंद आहे. त्यातही रस्त्याच्या कडेला मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटनात वाढ झाली आहे. त्यामुळे रस्त्यातील खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणी सामाजिक युवा ब्रिगेड संघनेच्या वतीने करण्यात आली आहे.
अंधारी, उमा नदीला घाणीचा विळखा
मूल : अंधारी, उमा, शिरना, इरई, झरपट आदी नद्या बारमाही वाहतात. परंतु या नद्या प्रदूषित झाल्या आहेत. नद्यांच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. काही पर्यंटक नदीचे पाणी बघण्यासाठी येत असतात. पण नदीत घाण पसरल्यामुळे पर्यंटकांना दुर्गधीचा सामना करावा लागत आहे.