शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

'मुख्यमंत्री माझी शाळा' अभियानाचे बदलले निकष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 11:57 IST

Chandrapur : मागीलवर्षी निवड झालेल्या तसेच निम्न क्रमांकाच्या शाळा ठरणार अपात्र

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानातील दुसरा टप्प्यातील बदललेल्या निकषानुसार १५० गुण केले. याशिवाय मागील वर्षी शाळांचा पुरस्कार प्राप्त झालेला क्रमांक किंवा त्यापेक्षा निम्न क्रमांकासाठी यावेळी विचार केला जाणार नाही. त्यामुळे नवीन शाळांना पुरस्काराची संधी मिळणार आहे. असे असले तरी दुसऱ्या टप्प्यात बदल केल्याने अशा शाळांना वरच्या स्तरावरील क्रमांक मिळण्याची धडपड करावी लागणार आहे.

शाळांचा भौतिक, शैक्षणिक विकासाबरोबरच पालक सहभाग वाढविण्यासाठी शासनाने 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या अभियानाअंतर्गत शाळांना प्रोत्साहित करीत आहे. दुसऱ्या टप्प्यातील शाळांचे तालुकास्तरीय मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केंद्रीस्तरीय ऑनलाइन मूल्यांकनासाठी सोडत पद्धतीने केंद्रप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. केंद्रस्तरीय तसेच तालुकास्तरीय मूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, शिक्षण विभागाकडून दुसऱ्या टप्प्यात बदल केला आहे. यामध्ये मागील वर्षी शाळांचा पुरस्कार प्राप्त झालेला क्रमांक किंवा त्यापेक्षा निम्न क्रमांकासाठी यावेळी विचार केला जाणार नाही. असा बदल केल्याने अशा शाळांचा वरचा टप्पा गाठण्यासाठी सध्या चांगलीच कसरत करावी लागत आहे.

मूल्यांकनात या बाबी ठरणार महत्त्वपूर्णमूल्यांकनात शाळास्तरावर स्काऊट गाइड, महावाचन चळवळ, अध्ययन निष्पत्ती, विविध समितीची अद्ययावतीकरण, शिक्षकांचा गुणात्मक विकास, क्षमतेनुसार वर्ग खोल्या, फर्निचर, आरोग्य सुविधा या बाबी पुरस्कारासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षकांची धडपड 

  • स्पर्धेत टिकण्यासाठी जिल्ह्यातील काही शिक्षकांनी धडपड सुरू केली आहे. 
  • लोकसहभाग वाढवून या माध्यमातून शाळांचा विकास केला जात आहे. आपल्याच शाळेचा नंबर यावा यासाठी शिक्षकांची बरीच धडपड सुरू आहे.

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर