शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

युवकांच्या पुढाकारातून समाजात परिवर्तन शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:23 IST

पुरुषोत्तम सातपुते : कुणबी समाज मंडळातर्फे राज्यस्तरीय ऑनलाइन उपवर-वधू मेळावा चंद्रपूर : समाजातील युवक एकत्रित आल्यास काय होऊ शकते, ...

पुरुषोत्तम सातपुते : कुणबी समाज मंडळातर्फे राज्यस्तरीय ऑनलाइन उपवर-वधू मेळावा

चंद्रपूर : समाजातील युवक एकत्रित आल्यास काय होऊ शकते, हे लोकसभा निवडणूक, ओबीसी विशाल मोर्चा आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत दिसून आले. युवकच समाजात परिवर्तन घडवून आणू शकतात. ज्या समाजातील युवक जागरूक, धडपडीचे असतील, त्या समाजाला कशाचीही कमतरता नसल्याचे मत धनोजे कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते यांनी केले.

कुणबी समाज मंडळ चंद्रपूर आणि मध्यवर्ती धनोजे कुणबी समाजपुरस्कृत राज्यस्तरीय त्रीदिवसीय ऑनलाइन उपवधू-वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी ११ वाजता कुणबी समाज मंदिर येथे करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते.

यावेळी उद्घाटक म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर, प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ धनोजे कुणबी मध्यवर्ती समितीचे सचिव पवन राजूरकर, अनंत एकरे, पांडुरंग जरीले, डॉ. संजय लोहे, अ‍ॅड. संतोष कुचनकर, उत्तम मोहितकर, रमेश राजूरकर, भरत पोतराजे, दिनकर डोहे, पाडुरंग टोंगे, मधुकर ढोके, सचिव अतुल देऊळकर, कोषाध्यक्ष अरुण मालेकर, सहसचिव विलास माथनकर, सुरेश ढवस, आनंद वैद्य, विनोद पिंपळशेंडे उपस्थित होते.

आमदार प्रतिभा धानोरकर यांनी, समाजाच्या प्रगतीसाठी अशाप्रकारच्या कार्यक्रमाची आवश्यकता आहे. आपला समाजबांधव एखाद्या क्षेत्रात आपले भविष्य घडविण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्याला प्रत्येकाने मदत करायला हवी. त्याचे कुणीही पाय खेचण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले.

उपस्थित मान्यवरांचीही समायोचित भाषणे झालीत. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ''रेशीमगाठी'' स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. निवडक उपवर-उपवधुंचा परिचय मेळावा पार पडला. या ऑनलाइन मेळाव्यासाठी विजय मुसळे यांचे विशेष योगदान लाभले. संचालन प्रा. नामदेव मोरे तर आभार विलास माथनकर यांनी केले. त्रीदिवसीय ऑनलाइन वधू-वर परिचय मेळाव्यात २६ व २७ ला इच्छुक उपवर-उपवधुंचा परिचय घेण्यात येणार आहे. या मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी सर्व समाजबांधव, उपवर-उपवधूंनी कुणबी समाज चंद्रपूर या यु-ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे व बेल ऑयकॉनला प्रेस करावे, असे आवाहन कुणबी समाज मंडळ, उपवर-वधू परिचय मेळावा आयोजन समिती चंद्रपूरच्या वतीने करण्यात आले आहे.