शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

बाल विकास मंच व सखी ज्वेलर्सच्या घोषवाक्य स्पर्धेला चंद्रपूरकरांचा प्रचंड प्रतिसाद

By admin | Updated: July 31, 2016 01:52 IST

लोकमत बाल विकास मंच व सखी ज्वेलर्स चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा कल्पकतेला व कला

विजेत्यांना पुरस्कार वितरण : ‘पर्यावरण व स्वच्छता’ या विषयावर घोषवाक्य स्पर्धा चंद्रपूर : लोकमत बाल विकास मंच व सखी ज्वेलर्स चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा कल्पकतेला व कला गुणांना वाव देण्यासाठी घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘पर्यावरण व स्वच्छता’ या विषयावर ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच बक्षीस वितरण सोहळा स्थानिक ज्युबिली हायस्कूल, चंद्रपूर येथे शनिवारी दुपारी ३ वाजता पार पडला. या कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्य संग्रामी जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला दीप प्रज्ज्वलन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अनेक विद्यार्थी व पालकांनी उपस्थित दर्शवली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्युबिली हायस्कूलचे प्राचार्य चंद्रपूर डॉ. उज्जवल टिकाईत होते. तर प्रमुख उपस्थिती आनंद नागरी बँकेचे संचालक व लोकमत वितरक जितेंद्र चोरडिया, रमन बोथरा, लोकमत परिवारातील जेष्ठ सदस्य डॉ.अशोक बोथरा, सखी ज्वेलर्सचे संचालक नीलेश निशाने, लोकमतचे शाखा व्यवस्थापक विनोद बुले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमत जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर यांनी केले. सर्व विजयी स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले . बाल विकास मंच सदस्य नोंदणीसाठी प्रोत्साहित करून मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन संयोजिका पूजा ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्युबिली हायस्कूलचे एनसीसी आॅफीसर बारसागडे तथा अमोल कडूकर यांचे अमूल्य सहकार्य लाभले. विजयी स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे आहे. आंतरशालेय घोषवाक्य स्पर्धा -२०१६ प्रथम- इशिका नंदकिशोर राऊत, चांदा पब्लिक स्कूल चंद्रपूर, द्वितीय - फाल्गुनी मुरलीधर नन्नावरे, सेंट मायकल इंग्लिश स्कूल, चंद्रपूर, तृतीय - आदित्य गणेश भालेराव, सेंट फ्रान्सीस टीएसके स्कूल चंद्रपूर, चवथा - वेदिका संजय सोनुने, पॅरामाऊंट कॉन्व्हेंट, चंद्रपूर, पाचवा - अश्विनी राजू जुनघरे - ज्युबिली हायस्कूल, चंद्रपूर मातोश्री विद्यालय तुकूम तनुश्री युवराज खेवले, सलोनी प्रमोद येरगुडे, धनश्री पांडुरंग सावरकर सेंट फ्रॅन्सिस टीएसके इंग्लिश स्कूल प्रज्ज्वल विनोद वानखेडे, जानवी नरेश गुरफुडे, पूजा दिलीप निखाडे, तन्वी गोविंद पन्नासे, कामिल के. बेग, आयुष अ. बुरडकर, अमन अजय बुरडकर, संस्कृती राजू बेद्दार, यश किशोर काटकर, कल्याणी नरेश मोगरे, यशस्वी नरेश मोगरे, यश सुरेश खनके ज्युबिली हायस्कूल, चंद्रपूर ओम अजय चवरे, प्रथम अनिरुद्ध खोब्रागडे सेंट मायकल इंग्लिश स्कूल, चंद्रपूर शुभ्रा श्रावण साखरकर, सृष्टी शितल मेश्राम, साहिल श्रीराम गुरनुले, हर्षित प्रमोद शंभरकर, मनस्वी बुलेश रंगारी चांदा पब्लिक स्कूल फरदिन ज. शेख, एजंल सुनार, आयुषी दीपक गडलिंग, सोनिया मनोज कवाडे, विधान कल्याण बडकेलवार लोककल्याण टिळक कन्या विद्यालय दीक्षा राकेश कांबळे, ऐश्वर्या अनंत झोडे, साक्षी प्रशांत बोदेले, साक्षी अजय डाखोरे, पायल प्रकाश बानकर, मिताली प्रवेश गर्गेलवार, नम्रता आत्माराम सावंत, कल्याणी किशोर उरकुंदे, माणसी मोतीलाल रासेकर, खुशी सुनील बेतवार, सेंट आॅन्स हायस्कूल, सुमठाणा ऐश्वर्या जयंत दरेकर नारायणा विद्यालयम्, पडोली अनन्या मकरंद चौधरी पॅरामाऊनट कॉन्व्हेंट मृण्मयी संजय सोनुने