लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा दारूबंदी झाल्यानंतरच्या परिणामाचे पावर पॉइंट प्रेझेंटेशन करताना या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग म्हणाले, चंद्रपूरमध्ये दारूबंदी झाल्यामुळे वार्षिक जवळपास ८७ कोटी रुपये सरळ सरळ लोकांच्या खिशात वाचले. त्यामुळे चंद्रपूरसाठी दारूबंदी म्हणजे लोकांच्या खिशात डायरेक्ट कॅश ट्रान्सफर योजना आहे, याकडेही डॉ. बंग यांनी यावेळी लक्ष वेधले.चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या तीन जिल्ह्यांमध्ये दारूबंदी केल्यानंतर झालेल्या सामाजिक परिवर्तनाची आकडेवारीसह माहिती देताना दारू व तंबाखू हे नवे कॉलरा-प्लेग आहे. गुजरात राज्याने गेल्या सत्तर वर्षांमध्ये दारूबंदी केल्यानंतरही विकासामध्ये आगेकूच कायम ठेवली आहे. त्यामुळे दारूबंदीमुळे विकासावर परिणाम होतो हे चुकीचे असल्याचेही डॉ. बंग यांनी स्पष्ट केले. गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुक्तीपथ प्रयोगाबाबतही डॉ. बंग यांनी यावेळी माहिती दिली. संमेलनात सिने अभिनेत्री अनिता दाते केळकर यांनी देखील यावेळी उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ गायकवाड यांनी केले. संमेलनाला राज्यातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, व्यसनमुक्तीसाठी कार्य करणारे कार्यकर्ते, लेखक, शाळा व महाविद्यालयाील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला दारू समर्थकांचा खरपूस समाचारचंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केल्यानंतर दारू माफियांसह विक्रेत्यांकडून उलटसुलट तर्क लावण्याचे काम सातत्याने सुरू आहे. यावर ना. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे निमित्त साधून दारूविक्रीचे समर्थन करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. ना. मुनगंटीवार म्हणाले, व्यसनमुक्ती समाज निर्माण करणे हे ईश्वरीय कार्य आहे. चंद्रपूरात विषारी दारू मिळते, असा तर्क काही मंडळी लावत आहे. मुंबई, कोकणमध्ये दारूबंदी नसतानाही विषारी दारू काढल्या जाते. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तर्क लावणाºयांनी आपल्या घरात जन्मलेल्या मुलाला ग्राईप वॉटरऐवजी एक चमच व्हिस्की पाजावी, नाही तर एक चमक बॅण्डी पाजावी. मात्र त्यांनी स्वत:ची मुले व्यसनमुक्त व्हावे, असे वाटते. तसाच दुसºयांची मुलेही व्यसनमुक्त व्हावी याचा विचारही त्यांनी करावा. दारूबंदी केली. ती पूर्ण बंद होण्यासाठी काही कालावधी लागेल. दारुबंदी केल्यानंतर दारूविक्रेत्यांनी धमक्या दिल्या होत्या. ते राजकारणात हारविण्याची भाषा करतात. राजकारणात ते हारवू शकतील. पण दारूबंदी करून दारूसाठी आई-वडिलाचा, पत्नीचा, मुला-मुलीचा खून या घटना बंद झाल्या आहेत. अनेक उद्ध्वस्त होणारी कुटुंब वाचवून जीवनाची लढाई जिंकल्याचा आनंद आहे, या शब्दात त्यांनी दारूबंदीचे समर्थन करणाºयांवर हल्ला चढविला. सोबतच त्यांनी आपली दारूबंदीविषयीची भूमिका मजबूत असल्याचे पुन्हा एकवार ठासून सांगितले.१ टक्का अबकारी कर व्यसनमुक्तीसाठी खर्च करणारचंद्रपूरमधील दारूबंदी ही जनतेसाठी डायरेक्ट कॅश ट्रॉन्सफर योजनाचंद्रपूरमध्ये ७ व्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटनतज्ज्ञांचे विविध विषयांवर मार्गदर्शनशाळा व महाविद्यालयाच्या हजारो विद्यार्थ्यांचा सहभागव्यसनाधीनता सोडविण्यासाठी पूरक ठरणाऱ्या स्टॉलवर गर्दीराष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान
दारूबंदीमुळे चंद्रपूरकरांची ८७ कोटींची थेट बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:26 IST
चंद्रपूर जिल्हा दारूबंदी झाल्यानंतरच्या परिणामाचे पावर पॉइंट प्रेझेंटेशन करताना या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग म्हणाले, चंद्रपूरमध्ये दारूबंदी झाल्यामुळे वार्षिक जवळपास ८७ कोटी रुपये सरळ सरळ लोकांच्या खिशात वाचले. त्यामुळे चंद्रपूरसाठी दारूबंदी म्हणजे लोकांच्या खिशात डायरेक्ट कॅश ट्रान्सफर योजना आहे, याकडेही डॉ. बंग यांनी यावेळी लक्ष वेधले.
दारूबंदीमुळे चंद्रपूरकरांची ८७ कोटींची थेट बचत
ठळक मुद्देअभय बंग : व्यसनमुक्ती दिंडीने वेधले नागरिकांचे लक्ष