शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

चंद्रपूरकरांना ‘अमृत’साठी आणखी सहा महिन्यांची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:28 IST

चंद्रपूर : शहरातील साडेतीन लाख लोकसंख्येला पिण्याचे पाणी मिळावे, याकरिता केंद्र शासन पुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन अ‍ँड अर्बन ...

चंद्रपूर : शहरातील साडेतीन लाख लोकसंख्येला पिण्याचे पाणी मिळावे, याकरिता केंद्र शासन पुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन अ‍ँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे अमृत या नळ योजनेवर आतापर्यंत १९२ कोटी २० लाखांचा निधी खर्च झाला. तुकूम व विठ्ठल मंदिर झोनमध्ये प्रायोगिक स्तरावर नळयोजना सुरू झाली. मात्र, उर्वरित १४ झोनमधील लाखो नागरिकांना ‘अमृत’साठी पुन्हा किमान सहा महिन्यांहून जास्त काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीतून पुढे आले.

चंद्रपूर शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. सद्य:स्थितीत ८२ हजारांहून जास्त घरे असून, जुन्या पाणीपुरवठा योजनेतून केवळ ३५ हजार अधिकृत नळधारक पिण्याच्या पाण्याची गरज भागवितात. इतर नागरिकांना अन्य स्रोतांवर अवलंबून राहावे लागते. जुन्या नळयोजनेतून संपूर्ण शहराला मुबलक पाणीपुरवठा होऊ शकत नाही. मागील आठवड्यात शहरातील १६ पैकी दोन झोनमध्येच अमृत नळयोजना सुरू होऊ शकली. कामे पूर्ण न झाल्याने अमृत योजनेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली. परिणामी, नागरिकांमध्ये नाराजी आहे.

जलशुद्धिकरण केंद्राचे काम अपूर्णावस्थेत

तुकूम येथील जलशुद्धिकरण केंद्राच्या सुधारणेचे ७३ टक्के काम पूर्ण झाले. परंतु, क्लरिफाय, प्लॅश मिक्सर, फिल्टर रूम, अ‍ॅलम सोल्युशन टँक, ब्लोअर, फिल्टर बेडमधील पॅनेल, तसेच १७० अश्वशक्तीचे तीन पंप बदलविण्याची कामे पूर्ण झाली आहेत.

इरई धरणातील पंपहाऊसचे विस्तारीकरण

इरई धरणातील हेडवर्क्समधील पंप हाऊस विस्तारीकरणाचे काम ९८ टक्के पूर्ण झाले. त्यातील तीन लाख लिटर बीपीटीचे कामही अंतिम टप्प्यात आहे. ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले. प्रकल्पाच्या तांत्रिक व वीज कामांसाठी ५ कोटी १५ लाखांचा निधी खर्च झाला आहे.

झोननिहाय पाण्याची टाकी

तुकूम, शास्त्रीनगर, बंगाली कॅम्प, नेताजी नगर बाबूपेठ, बाबूपेठ हायवे, रेव्हनी कॉलनी व वडगाव येथील एकूण आठ पाण्याच्या टाकींचे ९४ टक्के बांधकाम पूर्ण झाले. महाकाली झोनमधील टाकीचे काम ९१ टक्क्यांवर थांबले. किरकोळ कामेही शिल्लक आहेत.

पाईपलाईन ८८ टक्क्यांवर अडले

तुकूम व रामनगर झोनमध्ये ९००, ६००, ४५०, ४०० आणि ३०० एमएम व्यासाच्या पाईपलाईनचे काम ८८ टक्क्यांवर अडले. गुरुत्ववाहिनीची कामे १०० टक्के पूर्ण करण्याचे मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. बाबूपेठ येथील पाण्याच्या टाकीसाठी ३५० व ४०० एमएम व्यासाचे पाईपलाईन काम पूर्ण झाले आहे.