शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

चंद्रपूरकर होरपळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:30 IST

चंद्रपूर शहर सध्या होरपळून निघत आहे. मागील पाच दिवसांपासून सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. जणू संपूर्ण चंद्रपूर शहरालाच आग लावण्याचा विडा सूर्याने उचलला की काय, असा भास होत आहे. यामुळे जनजीवन प्रभावित झाले.

ठळक मुद्देसूर्याचा कोप कायम : जनजीवन प्रभावित, दुपारी रस्ते निर्मनुष्य

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहर सध्या होरपळून निघत आहे. मागील पाच दिवसांपासून सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. जणू संपूर्ण चंद्रपूर शहरालाच आग लावण्याचा विडा सूर्याने उचलला की काय, असा भास होत आहे. यामुळे जनजीवन प्रभावित झाले. दुपारी चंद्रपुरातील रस्ते ओस पडत आहे. डोक्यावर टोपी, कानाला रुमाल बांधल्यानंतरही उन्हाचे चटके बसत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडताना धडकी भरत आहे. रविवारी ४७.२ अंश सेल्सिअस हे राज्यातील सर्वाधिक तापमान चंद्रपुरात नोंदविण्यात आले. सोमवारीही ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.चंद्रपूरकरांना पूर्वी कधी एवढे उन्हाने घाबरविले नाही. मात्र यावेळी एप्रिल महिन्यातच तापमानाने कहर केला आहे. एप्रिल महिन्यातच चंद्रपूरकरांनी मे महिन्यातला नवतपा अनुभवला आहे. कडक उन्हाळ्यामुळे रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. रस्ते असे निर्मनुष्य झाले आहे. उष्माघाताच्या बचावासाठी बहुतांश नागरिकांच्या खिशात कांदा दिसून येतो.उष्ण वारे वाहत आहेत. यावर्षीच्या उन्हाळा जीवघेणा ठरत आहे. दुपारच्या सुमारास रस्त्यावर शुकशुकाट आहे. एरवी गल्लीबोळात दुपारी फिरणारे फेरीवाले आता फिरताना दिसत नाहीत.नागरिकांचीही वर्दळ नसते. दिवसभर कुलरच्या हवेत कामकाज सुरू आहे. बसेसमध्ये गर्दी कमी दिसू लागलेली आहे.सूर्य प्रखरतेने तापत आहे. सर्वत्र वाढत्या तापमानाचा विपरित परिणाम जाणवत आहे. अत्यावश्यक कामासाठी नागरिक घराबाहेर पडले तरीही पाच मिनिटातच ते थंड ठिकाणी शिरण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.कुलर, पंख्यानेही दिलासा नाहीकालप्रवाहात तापमानापासून संरक्षित ठेवण्यासाठी कुलर, पंखे, एसी आदी इलेक्ट्रीक साधने उपलब्ध झालीत. दिवसागणिक वाढत जाणारे तापमान असह्य होत आहे. जिल्ह्यातील आबाल - वृद्ध रखरखत्या उन्हात जिथे गारवा मिळते तिकड धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. मात्र तापमानाने एवढा उच्चांक गाठला आहे की घरातील कुलर, पंखेही नागरिकांना दिलासा देण्यास असमर्थ ठरत आहे.रस्ते झाले निर्मनुष्यएप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उष्णतेत प्रचंड वाढ झाली. पारा ४७ अंशापार गेला आहे. दुपारच्या सुमारास गावातील रस्ते तर निर्मनुष्य दिसत आहेतच, सोबत शहराबाहेरील रस्तेही ओस दिसत आहे. चंद्रपूर-मूल, चंद्रपूर-बल्लारपूर, चंद्रपूर-घुग्घूस या मार्गावरही दुचाकींची वर्दळ दिसत नाही.ग्रामीण भागातदेखील शेतीची कामांवर परिणाम होत आहे. पूर्वी शेतकरी उन्हाळ्यात दिवसभर शेतात राबताना दिसायचे. मात्र आता उन्हामुळे त्यांनाही घाबरवून टाकले आहे. दुपारी १२ वाजताच शेतकरी शेतातून घरी येऊ लागले आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता पुन्हा शेतात कामासाठी जाताना दिसत आहे. याशिवाय ग्रामीण भागातील सर्वाधिक महत्त्वाच्या आठवडी बाजारातही याचा परिणाम दिसत आहे. कोठारी येथे रविवारी आठवडी बाजारात शुकशुकाट होता.