शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:34 IST

नागपूर भूमी अभिलेख विभागामार्फत प्रदेश कर्मचारी कल्याणकारी निधी, नागपूरद्वारा आयोजित विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत चंद्रपुरातील संघाने अव्वल क्रमांक पटकाविले.

ठळक मुद्देभूमी अभिलेखचे आयोजन : विजेत्यांना पुरस्कार

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : नागपूर भूमी अभिलेख विभागामार्फत प्रदेश कर्मचारी कल्याणकारी निधी, नागपूरद्वारा आयोजित विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत चंद्रपुरातील संघाने अव्वल क्रमांक पटकाविले. ही स्पर्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे क्रीडा प्रांगणात नागपूर येथे विभागीय भूमी अभिलेख उपसंचालक बाळासाहेब काळे यांच्या मार्गदर्शनात पार पडली.नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील चमंूनी विविध क्रीडा प्रकारातील स्पर्धेत भाग घेतला होता. सांस्कृतिक क्रीडा प्रकारात सोलो गायन, युगल गायन, समूह नृत्य, नाटक व दिग्दर्शक प्रकारात चंद्रपूर जिल्ह्याने विजेतेपद पटकावून क्रीडा स्पर्धेचा पुरस्कार मिळविला. चंद्रपूर जिल्ह्यातील चमूने सांघिक क्रीडा प्रकारात खो-खो महिला व पुरुष, व्हॉलीबॉल व सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. तर क्रिकेट व थ्रो बॉल क्रीडा प्रकारात उपविजेतेपद पटकाविले.वैयक्तिक क्रीडा प्रकारात १०० मीटर, २०० मीटर व ४०० मीटर धावण्यामध्ये सुमीत किन्नाके व सतीश येनुगवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. महिला ४०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात अनुराधा काकडे यांनी प्रथम क्रमांक आणि धाव स्पर्धेतही प्रथम पुरस्कार चंद्रपूर जिल्ह्याच्या चमूने मिळविला.बॅडमिंटल एकेरी महिला व पुरुष गटात अनुक्रमे मिलिंद राघोते व अनुराधा काकडे यांनी प्रथम क्रमांक पटकावून जिल्ह्याचे वर्चस्व सिद्ध केले. बॅडमिंटन दुहेरी पुरुष गटात मिलिंद राघोर्ते व सतीश येनुगवार यांनी प्रथम पारितोषिक पटकावून त्यात मोलाची भर घातली. गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, तीन किमी चालणे महिला गटातदेखील प्रथम पारितोषिक पटकावून जिल्ह्यातील क्रीडापटूंनी विभागात वर्चस्व सिद्ध केले.जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अभय जोशी यांनी देखील ४५ वर्षे वयोगटात गोळाफेक व तीन किमी चालणे प्रकारात भाग घेऊन द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावून जिल्ह्यातील क्रीडापटूंना प्रेरणा दिली. अभय जोशी व अधिनस्त सर्व उपअधीक्षक भूमी अभिलेख तसेच जिल्हा अधीक्षक भमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धेत विभागीय जनरल चॅम्पियशिप प्राप्त केले. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलील, भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक अभय जोशी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.