शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

चंद्रपुरात प्रकल्पग्रस्तांची वीज केंद्राच्या चिमणीवर चढून विरुगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 22:01 IST

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात बुधवारी सकाळपासून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देतत्काळ मोबदला देण्याची मागणीजमिनी घेतल्या, मात्र नोकरीत सामावले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात बुधवारी सकाळपासून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. प्रकल्पात जमीन अधिग्रहित होऊनही अजूनपर्यंत नोकरी मिळाली नसल्याने हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रासाठी शासनाने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहित केल्या होत्या. परंतु अजूनही काही शेतकऱ्यांना नोकरीत सामावून घेण्यात आलेले नाही. वारंवार निवेदने देऊनही नोकरी मिळाली नसल्याने शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले.बुधवारी सकाळीच हे प्रकल्पग्रस्त महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरात जमा झाले आणि त्यांनी आंदोलन सुरू केले. दरम्यान आंदोलकांपैकी दोन महिला आणि दोन पुरुष प्रकल्पग्रस्त ८ क्रमांकाच्या बॉयलरच्या चिमणीवर चढले. तिथेच त्यांनी ठाण मांडले.आम्हाला तत्काळ नोकरीत सामावून घेण्यात यावे, अशी त्यांची मागणी असून जर कुणीही आम्हाला खाली उतरविण्यासाठी वर चढण्याचा प्रयत्न केला तर आम्ही वरून उडी घेऊन आत्महत्या करू, अशी धमकीच प्रकल्पग्रस्तांनी दिली होती.प्रकल्पग्रस्त चिमणीवर चढले कसे?महाऔष्णिक विद्युत केंद्रात चोख सुरक्षा व्यवस्था असल्याचा दावा होत असताना तसेच तिथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचासुद्धा बंदोबस्त असताना हे प्रकल्पग्रस्त बॉयलरच्या चिमणीवर चढलेच कसे, हा मोठा प्रश्न आहे. यावरून केंद्राची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसत आहे.

टॅग्स :agitationआंदोलन