चंद्रपूर : केंद्र व राज्य सरकारने अनेक लोकोपयोगी योजना अंमलात आणल्या. याची माहिती जनतेला व्हावी, यासाठी महानगर पालिका घरोघरी जावून नागरिकांच्या भेटी घेऊन योजनांही माहिती देत आहे.पं. दीनदयाल उपाध्याय जन्म शताब्दी निमित्त येथील विवेक नगर प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कामाच्या उपलब्धीचा लेखाजोगा सादर करण्यात आला. या अभियानात महापौर स्वीकृत अंजली घोटेकर, नगरसेवक राजीव गोलीवार, संदीप आवारी, रामपाल सिंह व पुष्पा उराडे, प्रभाग अध्यक्ष देवेंद्र मोगरे, संजय उराडे, सचिन बिसेन, शरीफ भाई व कार्यकर्तागण सहभागी झाले.
चंद्रपूर मनपा प्रत्येक नागरिकांच्या घरी
By admin | Updated: June 17, 2017 00:39 IST