एम.टी. साव यांचे प्रतिपादन : मूलनिवासी संघातर्फे गुणवंतांचा सत्कारबल्लारपूर : चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोळशाच्या खाणी, वीज निर्मिती केंद्र, सिमेंट कारखाने, स्टिल प्लॅन्ट, आॅर्डनन्स फॅक्ट्री, पेपरमिल आदी मोठे उद्योग असून अनेक छोटे उद्योग आहेत. त्याचबरोबर या कारखान्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे फार मोठे प्रदूषण आहे. धुरामुळे नागरिकांना फुफ्फुसाचे रोग, त्वचेचे रोग, टी.बी, हार्ट अॅटक, श्वसनाचे रोग, कँन्सर अशा अनेक गंभीर रोगाचा सामना करावा लागत आहे. मात्र एकही अद्यावत रुग्णालय चंद्रपूरमध्ये अस्तित्वात नाही. याची दखल घेऊन मूलनिवासी संघ जिल्हा शाखा चंद्रपूरचे वतीने चंद्रपूरला महाराष्ट्र शासनाचे मेडिकल कॉलेज व्हावे याकरीता महाराष्ट्र सरकारला अनेक वेळा निवेदन दिले. धरणे आंदोलन करुन निदर्शने केली. त्यामुळे चंद्रपूरला मेडिकल कॉलेज सुरू होणे ही काळाजी गरज आहे, असे प्रतिपादन मूल निवासी संघ दिल्लीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य एम.टी. साव यांनी केले.मूल निवासी जिल्हा शाखा चंद्रपूर वतीने प्रज्ञा बुद्ध विहार विसापूर येथे सोमवारी १० वी आणि १२ वीच्या परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मूलनिवासी मेळावा २०१५ या कार्यक्रमांतर्गत ज्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांचा बक्षिस वितरण कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी एम.टी. साव होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जी.के. उपरे, एच.सी. सहारे, नत्थुजी ठाकरे, ताराचंद थुल, सुधाकर कुईटे, दादाजी वाघमारे, विजय मोरे, दिगांबर झामरे, कांताबाई बोरकर, पंचशिला वाहाणे उपस्थित होते. मूल निवासी मेळाव्यांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांंना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊून त्यांचा सत्कार करण्यात आला.दहावीच्या परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या उत्कर्षा वैद्य, नेहा सुधाकर कुईटे, रचना पाझारे यांचाही पाहुण्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. (तालुका प्रतिनिधी)
चंद्रपूरला मेडिकल कॉलेज काळाची गरज
By admin | Updated: July 2, 2015 01:25 IST