शिवाजीराव मोघे : इच्छुकांच्या मुलाखतीसाठी गर्दीचंद्रपूर : चंद्रपूर महानगर पालिकेच्या होऊ घातलेल्या आमागी निवडणुकीत काँगे्रसला बहुमतात आणण्याचा निर्धार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी कार्यकत्यांच्या साक्षीने चंद्रपुरात व्यक्त केला.आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रसच्या वतीने मंगळवारी तिकीटेच्छूक उमेदवारांचे अर्ज भरून मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या निमीत्त कार्यकर्त्यांचा मेळावाही पार पडला. पक्षाचे निवडणूक प्रभारी एस. क्यू. जामा, सहप्रभारी प्रमोद तितीरमारे, यांच्यासह निवडणूक निरीक्षक माजी खासदार नरेश पुगलिया, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, डॉ. वजाहत मिर्झा, जिया पटेल, नितीन कुंभलकर, अग्नीहोत्री, पांडव, नागाजी आदीसह नऊही निरीक्षक उपस्थित होते. मेळाव्याच्या प्रारंभी दिवंगत वीर जवान देवीदास गेडाम आणि विदर्भवादी नेते जाबुंवंतराव धोटे यानना श्रद्धांजली वाहण्यात आली. दुपारी पाऊणेदोन ते पाऊणेपाच या वेळात पार पडलेल्या या मुलाखतीसाठी शहरातील १७ प्रथागातून ६४० अर्ज प्राप्त झाले. या सर्वांच्या मुलाखती या निवडणूक निरीक्षकांच्या चमूने घेतल्या. जवळपास ८९ टक्के मुलाखती पूर्ण झाल्या असून उर्वारितांना अर्ज करण्याची मुदत १५ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. काँग्रसचे नेते देवराव भांडेकर, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बागडे, सुभाषसिंग गौर, डॉ. आसावरी देवतळे, डॉ. विजय देवतळे यांच्यासह अनेक नेतेमंडळी या बैठकीला उपस्थित होते. विशेषत: पुरूषांच्या बरोबरीने महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या दरम्यन झालेल्या पत्रकार परिषदेत शिवाजीराव मोघे म्हणाले, देशातील विधानसभा निवडणुकांचा निकाल विपरित आला असला तरी मनपा निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता काँग्रसवरील जनतेचा विश्वास अणि या निवडणुकीत विजयाचा निश्चय स्पष्ट दिसत होता. बहुमताने विजय मिळविण्याचे नियोजन या वेळी केले असून सर्व पक्षनेते एकत्र कामाला लागले आहेत.विद्यमान नगरसेवकांंनी पुन्हा लढण्याची इच्छा व्यक्त केल्यास तिकीटा दिल्या जाणार आहेत. मित्रपक्षांना सोबत घेऊन लढण्याच्या दृष्टीने चर्चा सुरु आहे. तसे ठरले तर त्यांनाही समावून घेतले जाईल, असे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)‘त्या’ १२ नगरसेवकांचाविचार नाही वेगळा गट करून भाजपाला मदत करणाऱ्या काँगे्रसमधील १२ नगरसेवकांचा या वेळी तिकीटासाठी जराही विचार केला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवाजीराव मोघे यानी व्यक्त केली. ते म्हणाले, पक्षाच्या तिकीटावर निवडून आल्यावर केवळ स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षाला मदत करणे ही पक्षाशी प्रतारणा असून गंभीर प्रकार आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. या वेळच्या निवडणुका माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात लढल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चंद्रपूर मनपात काँगे्रसला बहुमतात आणणार
By admin | Updated: March 15, 2017 00:32 IST