शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव; ९ ते ११ फेब्रुवारीदरम्यान आयोजन

By साईनाथ कुचनकार | Updated: February 7, 2024 18:27 IST

सिनेरसिकांना मेजवानी, चंद्रपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (सिफ) उद्घाट्न ९ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.

चंद्रपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय सिनेमा आणि या क्षेत्रात काम करणारी मंडळी दर्जेदार आणि गुणसंपन्न आहेत; परंतु जगातील तसेच भारतातील उत्तम चित्रपट चंद्रपूरच्या रसिकांना बघता यावे, यासाठी पुणे फिल्म फेस्टिव्हलच्या धर्तीवर चंद्रपूर फिल्म फेस्टिव्हल (सिफ)चे आयोजन मागील वर्षीपासून करण्यात आले आहे. येत्या ९ फेब्रुवारीपासून दुसरा तीन दिवसीय चंद्रपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मीराज सिनेमा येथे सुरू होत आहे. सिनेरसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

चंद्रपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (सिफ) उद्घाट्न ९ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक-निर्माते जब्बार पटेल उपस्थित राहणार आहेत. ९ ते ११ फेब्रुवारीदरम्यान मीराज सिनेमा येथे होणाऱ्या या महोत्सवाची ‘सिनेमा इज होप’ ही थीम आहे. या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार आहे. त्यानिमित्ताने नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा, महानगरपालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.१७ चित्रपटांचे होणार प्रदर्शन

उद्घाटन सोहळ्यानंतर ‘वल्ली’ (मराठी, दिग्दर्शक-मनोज शिंदे) हा उद्घाटनाचा चित्रपट (ओपनिंग फिल्म) दाखवण्यात येणार आहे. महोत्सवात एकूण देश-विदेशांतील १७ चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. हे सर्व चित्रपट इंग्लिश सबटायटलसहित प्रेक्षकांना पाण्याची संधी लाभणार आहे. मागील वर्षीच्या महोत्सवाला चंद्रपूरच्या चित्रपट प्रेमिकांनी दिलेली दाद म्हणूनच यावर्षी देखील उत्तमोत्तम चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

महोत्सवात दाखवले जाणारे चित्रपट खालीलप्रमाणे

वल्ली, ह्युमनिसट व्यंपायर सिकिंग कन्सेंटिंग स्युसायडिकल पर्सन, द फॉक्स, इरत्ता, गुड्बाय ज्युलिया, सिटी ऑफ विंड, द साइरन, लव इज फॉर ऑल, द बर्डेनेड, बिहाइंड द माउंटन्स, आर्ट कॉलेज १९९४, भेरा, सिटीजन सेंट, द बुरीटी फ्लॉवर, डेजर्ट, बहादूर आणि जिप्सी.