शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

दुग्ध उत्पादनात धवलक्रांती घडविण्याची चंद्रपूरला संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:46 IST

विदर्भातील शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत बदल घडविण्यासाठी शेतीवर आधारित उद्योग वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मदर डेअरी हा प्रकल्प याच प्रयत्नांचा भाग असून जिल्ह्यात दुग्ध क्रांती घडविण्यासाठी ही महत्त्वाची संधी आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : अधिकाऱ्यांनी योजनांची अंमलबजावणी करावी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विदर्भातील शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत बदल घडविण्यासाठी शेतीवर आधारित उद्योग वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मदर डेअरी हा प्रकल्प याच प्रयत्नांचा भाग असून जिल्ह्यात दुग्ध क्रांती घडविण्यासाठी ही महत्त्वाची संधी आहे. अधिकाऱ्यांनी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. शासकीय विश्रामगृहामध्ये पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी उपमहापौर अनिल फुलझेले व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ना. अहीर म्हणाले, सध्या जिल्ह्यात १५ हजार लीटर दुध संकलनाचे काम सुरु असून यामध्ये उतरोत्तर वाढ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मदर डेअरी व दूध उत्पादक संकलन केंद्रातील संचालकांच्या समस्या सोडविण्याकडेही लक्ष दिले जात आहे. मात्र, विविध खासगी कंपन्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घ्यावी.जिल्ह्यात दुधाळू जनावरांच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पशुधन विविध शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार करून गरजू शेतकºयांना लाभ मिळवून दिला पाहिजे, यासाठी पशुसंवर्धन विभागाने प्रयत्न करावे, याकडे ना. अहीर यांनी लक्ष वेधले. यावेळी दुधातील फॅटविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसाय करण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकरी कुटुंबांना मुद्रा योजनेमधून कर्ज उपलब्ध करावे, असे निर्देश जिल्हा अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिले. केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेमध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली असून चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक कर्ज उपलब्ध करुन देण्याचा विक्रम पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.सर्व बँकांनी याबाबतीत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच ज्या ठिकाणी महिलांकडून कर्जाची मागणी झाली. तिथे प्राधान्याने कर्ज उपलब्ध करुन देण्याविषयी चर्चा झाली.ग्रामीण व शहरी भागातील शेतकऱ्यांना कृषिपूरक योजनेतून विकास करता येतो. त्यासाठी तालुका, ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची जिल्ह्यात कशी स्थिती आहे, यासंदर्भातही आढावा बैठकीत चर्चा झाली.गरजूंना लाभ द्याकेंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जिल्ह्यात राबविले जात आहेत. ग्रामीण भागातील शेतकºयांना जोड व्यवसाय मिळावा, यासाठी दुग्ध व्यवसायाला महत्त्व देण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती आणि पूरक व्यवसाय उभारण्यास बँकांनी अडवणूक करू नये, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. या आढावा बैठकीत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर