शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात चंद्रपूर-गडचिरोलीतच सर्वाधिक बळी 

By राजेश मडावी | Updated: May 17, 2023 16:46 IST

Chandrapur News २०१९ ते २०२२-२३ या चार वर्षांत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातच सर्वाधिक व्यक्तींचा बळी गेल्याचे वास्तव वन विभागाच्या अहवालातून पुढे आले.

राजेश मडावीचंद्रपूर : राज्यात ६ राष्ट्रीय उद्याने, ५० अभयारण्ये व २३ संवर्धन राखीव अशा एकूण ७९ संरक्षित क्षेत्रात वन्यजीव व्यवस्थापनात अनेक सुधारणा झाल्या. मात्र, मानव व वन्यजीव संघर्षातून नागरिकांचे बळी जाण्याच्या घटनांची तीव्रता संपली नाही. २०१९ ते २०२२-२३ या चार वर्षांत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातच सर्वाधिक व्यक्तींचा बळी गेल्याचे वास्तव वन विभागाच्या अहवालातून पुढे आले. आता खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांचा शिवारात संचार वाढू लागल्याने यंदाही हा धोका कायम आहे.

राज्याच्या वन विभागाने ‘मानव-वन्यजीव संघर्ष व उपाययोजना’ नावाची एक अधिकृत टिपणी नुकतीच जाहीर केली. त्यामध्ये २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या चार वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यूमुखी पडलेल्या २२ जिल्हानिहाय घटनांची नोंद केली. त्यानुसार, चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यांत सर्वाधिक व्यक्तींचे बळी गेले. २०१९ मध्ये राज्यात ४७ जणांचा मृत्यू झाला. त्यात चंद्रपूरच्या ४७ बळींचा समावेश होता. २०२०-२१ मध्ये राज्यात ८२ व चंद्रपुरात ३२ व गडचिरोली ९, २०२१-२२ मध्ये राज्यात ८६ तर चंद्रपुरात ४६, गडचिरोली १५ आणि २०२२-२३ मध्ये राज्यात ९० तर चंद्रपुरातील ५१ जणांचा बळी गेला. २०२२-२३ मध्ये बळी गेलेल्या राज्यातील ९० नागरिकांत चंद्रपूरचे ५१ व गडचिरोलीच्या २५ जणांचा समावेश आहे. त्यातही वाघाच्या हल्ल्यात २०२२ मध्ये चंद्रपूर ४५ तर गडचिरोलीत २४ अशा एकूण ६९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे वाघ-बिबट पाहणे पर्यटकांना सुखावणारे असेलही; पण मानव-वन्यजीव संघर्ष अत्यंत टोकदार झाला आहे. 

संघर्षाचे असे केले वर्गीकरण

राज्य वन विभागाने मानव-वन्यजीव संघर्षाचे वन्यप्राण्यांच्या प्रकारानुसार, जिल्ह्यांना वर्गीकृत केले. मानव -वाघ संघर्ष (चंद्रपूर जिल्हा) मानव- इतर मांस भक्षक व तृण भक्षक (संपूर्ण राज्य) व मानव-जंगली हत्ती (सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गडचिरोली व गोंदिया) असे  तीन संघर्ष नमुद करून या तिन्ही प्रकारच्या मानव-वन्यजीव संघर्षाला कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत, असा दावा केला आहे.

टॅग्स :Tigerवाघ