शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

चंद्रपुरात किसानपुत्रांचा ‘आत्मक्लेश’

By admin | Updated: October 3, 2016 00:44 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘खेड्याकडे चला’चा संदेश दिला होता.

शेतकऱ्यांची दुर्दशा सरकारमुळे : स्वामीनाथन आयोग लागू करण्याची मागणीचंद्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘खेड्याकडे चला’चा संदेश दिला होता. मात्र, आजघडीला खेडे ओस पडू लागली आहेत. शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच असून शासनाचे धोरण शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन स्वामीनाथन आयोगाची तत्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील किसानपुत्रांनी रविवारी जटपुरा गेट येथे ‘आत्मक्लेश’ आंदोलन केले. शेतकऱ्यांना गळफास ठरणारे कायदे रद्द केल्याशिवाय त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. यासाठी कमाल जमीन धारणेचा कायदा रद्द करावा, अत्यावश्यक वस्तूंचा कायदा रद्द करावा, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, किसानपुत्रांना सर्व प्रकारचे शिक्षण मोफत करावे, जमीन अधिग्रहण कायदा रद्द करावा, या मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. या आंदोलनात प्रा. विजय बदखल, नगरसेवक संदीप आवारी, प्रा. सुरेश चोपणे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष प्रदीप देशमुख, उमाकांत धांडे, अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, नगरसेवक बंडू हजारे, नगरसेवक सचिन भोयर, पांडुरंग गावतुरे, प्रकाश कामडी, प्रा. माधव गुरनुले, प्रा. कमलाकर धानोरकर, सरपंच पारस पिंपळकर, सरपंच अमोल ठाकरे, रविंद्र झाडे, किरण ढुमणे, संतोष ताजणे, भास्कर ताजने, किसन नागरकर, वसंता उमरे, देवेंद्र बेले, भाविक येरगुडे, प्रमोद काकडे सहभागी झाले होते. यावेळी अनेकांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकला. गावापासून दूर शासकीय सेवेत आणि खासगी व्यवसायात कार्यरत असलेल्या शेतकरीपुत्रांनी राज्यभरात कायदेशिर मार्गाने शेतकऱ्यांच्या समस्या शासनदरबारी मांडणे सुरू केले आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून चंद्रपुरात रविवारी भूमिपूत्र युवा संघ व भूमिपूत्र प्रतिष्ठानच्या पुढाकारातून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला राजकीय, सामाजिक संघटनांनीही पाठिंबा दर्शविला. प्रास्ताविक प्रा. विजय बदखल यांनी केले. संचालन प्रा. रविकांत वरारकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. आंदोलनात किसानपुत्र मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला जम्मू-काश्मिरमधील उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यशविस्तेसाठी लक्ष्मीकांत धानोरकर, अशोक सातपुते, प्रणय काकडे, अक्षय उरकुडे, हर्षल काकडे, प्रमोद उरकुडे, मनोज गोरे, पवन राजुरकर, विठ्ठल बलकी, रोशन आस्वले, दीपक उपरे, रूपेश उलमाले, संदीप जेऊरकर, महेश गुंजेकर, प्रदीप उमरे, प्रमोद निखाडे, प्रा. संजय गोरे, गजानन उमरे, अतुल जेनेकर, रूपेश ठेंगणे, किशोर तुराणकर, भुषण महाकूलकर, सचिन गौरकार, प्रदीप पिंपळशेंडे, राकेश लांडे, राजेश ताजने, विनोद गोवारदिपे, अमोल बोबडे, आकाश लांबट, हितेश गोहोकार यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)