शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
3
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
4
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
7
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
8
जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
9
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
10
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
11
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
12
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
13
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
14
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
15
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
16
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
17
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
18
अलर्ट! पैसे दुप्पट करण्याची हाव; एक मेसेज अन् गमावली आयुष्यभराची कमाई, करू नका 'ही' चूक
19
लग्नानंतर नवऱ्याने काम करु दिलं नाही तर...? रिंकू राजगुरु म्हणाली, "तो हिसकावून घेत असेल..."
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल @ ९२.१०

By admin | Updated: May 28, 2015 00:06 IST

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल ....

ग्रामीण विद्यार्थ्यांची शहरी विद्यार्थ्यांवर मात : मूल तालुका आघाडीवर तर वरोरा माघारलाचंद्रपूर : महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी ‘आॅन लाईन’ घोषित करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ९२.१० इतकी आहे. २५ हजार १६९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी २५ हजार १३७ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यात २३ हजार १५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मूल तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९६.६५ टक्के लागला आहे. तर ८९.९९ टक्केवारीसह वरोरा तालुका पंधराव्या क्रमांकावर आहे. गतवर्षी शहरी विद्यार्थ्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांवर मात केली होती. यंदा तालुकानिहाय निकालाची टक्केवारी बघितल्यास ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी निकालात सरशी घेतल्याचे दिसून येते. चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी या शहरीभागापेक्षा गोंडपिपरी, मूल, पोंभूर्णा, जिवती सारख्या ग्रामीण तालुक्यांनी चांगला निकाल दिला आहे. विज्ञान शाखेतून ८ हजार ७२० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी ८ हजार ७०७ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यात ८ हजार ३८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९६.३२ इतकी आहे. यामध्ये ३२० विद्यार्थी विशेष प्राविण्यता, २ हजार ०९ प्रथम, ५ हजार ६४५ द्वितीय, तर ४१३ विद्यार्थी तृतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.कला शाखेतून १३ हजार १६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी १३ हजार १५७ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यात ११ हजार ७६७ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ८९.४४ इतकी आहे. यामध्ये २३४ विद्यार्थी विशेष प्राविण्यता, २ हजार ९२३ प्रथम, ७ हजार ६१५ द्वितीय तर ९९५ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतून एकूण १ हजार ७९० विद्यार्थ्यांनी परीक्षेसासाठी नोंदणी केली होती. पैकी १ हजार ७८८ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यात १ हजार ६५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेच्या निकालाची टक्केवारी ९२.२८ इतकी आहे. यामध्ये १२७ विद्यार्थी विशेष प्राविण्यता, ५७७ प्रथम, ८३६ द्वितीय तर ११० विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. एमसीव्हीसी शाखेतून एकूण १ हजार ४९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. पैकी १ हजार ४८५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १ हजार ३४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ९०.६४ इतकी आहे. १५ विद्यार्थी विशेष प्राविण्यता, ५३२ प्रथम, ७७६ द्वितीय तर २३ तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. (स्थानिक प्रतिनिधी)निकालात विज्ञान शाखा अव्वल४यावर्षीच्या बारावीच्या निकालात विज्ञान शाखेचा निकाल इतर शाखेच्या तुलनेत अव्वल ठरला आहे. विज्ञान शाखेतून ८ हजार ३८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी टक्केवारी ९६.३२ इतकी आहे. कला शाखेतून ११ हजार ७६७ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ८९.८४ इतकी आहे. वाणिज्य शाखेतून १ हजार ६५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेच्या निकालाची टक्केवारी ९२.२८ इतकी आहे. एमसीव्हीसी शाखेच्या निकालाची टक्केवारी ९०.६४ इतकी आहे. यंदाही मुलींनी मारली बाजीइयत्ता बारावीच्या निकालात यंदाही जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली. मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.१२ इतकी असून मुलांच्या निकालाची टक्केवारी ९०.०७ इतकी आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण २५ हजार १६९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामध्ये १२ हजार ६०३ मुलांचा तर १२ हजार ५६६ मुलींचा समावेश होता. एकूण २५ हजार १३७ विद्याथी परीक्षेला सामोरे गेले. यामध्ये १२ हजार ५६९ मुलांचा तर १२ हजार ५५८ मुलींचा समावेश होता. या परीक्षेत २३ हजार १५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ११ हजार ३३० मुलांनी तर ११ हजार ६२० मुलींनी बाजी मारली. शून्य टक्के निकालदेणारी शाळायावर्षीचा निकाल चांगला लागला आहे. मागील वर्षी ८७.६६ टक्के निकाल लागला होता. यंदा तब्बल ९२.१० टक्के एवढा निकाल लागला आहे. तरीही जिल्ह्यातील चिचपल्ली येथील सम्राट अशोक हायस्कुल अ‍ॅण्ड ज्यू. कॉलेज, नागाळाने यंदाही शून्य टक्के निकाल दिला आहे. गेल्या वर्षीही या शाळेने शुन्य टक्के निकाल दिला होता. यावर्षीही शाळेची शुन्य टक्क़े निकालाची परंपरा कायम राहिली आहे.