शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्यावर गोळीबार; थोडक्यात बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2023 22:44 IST

Chandrapur News चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत यांच्यावर गुरुवारी रात्री ९:४५ वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनातून आलेल्या एका बुरखाधारी अज्ञात इसमाने त्यांच्यावर बंदुकीतून गोळी झाडली.

राजेश भोजेकर

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत यांच्यावर गुरुवारी रात्री ९:४५ वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनातून आलेल्या एका बुरखाधारी अज्ञात इसमाने त्यांच्यावर बंदुकीतून गोळी झाडली. सुदैवाने ती गोळी हाताला चाटून गेल्याने रावत या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. या घटनेने मूल शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

घटनेनंतर संतोषसिंग रावत यांनी थेट मुल पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली आहे. यानंतर मुल पोलिसांनी मुल शहरात सर्वत्र नाकाबंदी करून आरोपीचा शोध घेणे सुरू केले आहे. परंतु पोलिसांना आरोपी गवसला नसल्याची माहिती आहे. पोलिसांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मूल शाखेतील सीसीटीव्ही कॅमेराची चौकशी केली असता हल्लेखोर एमएच 34 6152 या मारुती स्विफ्ट डिझायर कारने घटनास्थळी आले होते, असे निदर्शनास आले आहे या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू झाला आहे

प्राप्त माहितीनुसार, संतोषसिंग रावत हे मुल येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत बसले होते. तेथून बाहेर पडताच हल्लेखोर चारचाकी वाहनातून तिथे पोहोचले. त्या कारमधून बुरखाधारी एक हल्लेखोर मागच्या दारातून बाहेर आला आणि काहीही कळायच्या आत त्याने रावत यांच्यावर गोळीबार केला. मात्र त्याचा निशाणा चुकल्याने बंदुकीची गोळी रावत यांच्या हाताला चाटून गेली. यामुळे रावत थोडक्यात बचावले.  मूल शहरात अचानक झालेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. उद्या दिनांक 13 मे रोजी बाजार समित्यांच्या सभापती पदांची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर या घटनेकडे बघितले जात आहे. रावत यांच्यावर गोळी झाडणारा त्यांचा विरोधक कोण आहे? या दिशेने पोलीस तपास करीत आहेत. मूल पोलिसांनी रावत त्यांच्या तक्रारीवरून शहरात सर्वत्र नाकाबंदी केली आहे. मात्र अद्यापही कोणीही पोलिसांच्या हाती लागले नाही.

टॅग्स :FiringगोळीबारCrime Newsगुन्हेगारी