शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur: छोटा मटका सुरक्षित; शरीरावर किरकोळ जखमी, प्रकृती चांगली

By राजेश भोजेकर | Updated: November 17, 2023 19:33 IST

Chandrapur: बजरंग वाघासोबत झालेल्या झुंजीनंतर छोटा मटका दिसेनासा झाला होता. अखेर तो वनविभागाला गवसला आहे. त्यांच्या अंगावर झुंजीतील किरकोळ जखमा असून त्याची प्रकृती चांगली असल्याचे वनविभागाने एका प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट केले आहे.

- राजेश भोजेकर चंद्रपूर - बजरंग वाघासोबत झालेल्या झुंजीनंतर छोटा मटका दिसेनासा झाला होता. अखेर तो वनविभागाला गवसला आहे. त्यांच्या अंगावर झुंजीतील किरकोळ जखमा असून त्याची प्रकृती चांगली असल्याचे वनविभागाने एका प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट केले आहे. छोटा मटका दिसत नसल्यामुळे पर्यटकांमध्ये त्याच्याविषयी चिंतेचे वातावरण होता. आता ही चिंता दूर झाली आहे. त्यांचे छायाचित्रही जारी करण्यात आले आहे.दि. १४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान वनपरिक्षेत्र चिमूर (प्रादेशिक) परिक्षेत्रातील खडसंगी नियतक्षेत्रातील वहानगाव येथील सुभाष दोडके यांच्या शेतामध्ये टी- १२६ म्हणजेच छोटा मटका आणि टी-४४ म्हणजे बजरंग या दोन वाघांमध्ये जोरदार झुंज झाली होती.

या झुंजीत बजरंग या वाघाचा मृत्यू झाला. यानंतर छोटा मटकाही गंभीर जखमी असावा, असा संशय होता. मात्र तो दिसत नव्हता. अखेर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक व उपसंचालक (बफर) यांच्या आदेशान्वये दि. १५ व १६ नोव्हेंबर रोजी खडसंगी (बफर) वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे, यांच्यासोबत क्षेत्र सहाय्यक निमढेला बी. आर. रंगारी, क्षेत्र सहाय्यक आर. जे. गेडाम, खडसंगीचे वनरक्षक जी. एम. हिंगणकर, वनरक्षक निखील बोडे, वनरक्षक संतोष लोखंडे, वनरक्षक चेतन कोटेवार तसेच एसटीपीएफ व पीआरटी कर्मचारी, कुटी मजुर, रोजंदारी मजुर, अलिझंजा व निमढेला निसर्ग पर्यटनगेट वरील गाईड, जिप्सी चालक मालक अशा एकूण ६५ वनकर्मचाऱ्यांनी पायी गस्त केली. बजरंगचा मृत्यू झालेल्या ठिकाणापासून कक्ष क्र. ५७ व कक्ष क्र. ५५5 मध्ये एकूण १५ ट्रॅप कॅमेरे लावून झुंजीमध्ये जखमी झालेला छोटा मटका या वाघाचा शोध घेतला असता या वाघाच्या शरीरावर किरकोळ जखमा असून त्याची प्रकृती चांगल्या अवस्थेत असल्याचे दिसून आल्याने वनविभागाने म्हटले आहे.

टॅग्स :Tigerवाघ