शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

१८ महिन्यात चंद्रपूर बसस्थानक सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 23:50 IST

सन २०१५ चा अर्थसंकल्प सादर करताना एसटी बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलण्याची घोषणा अर्थमंत्री म्हणून आपण केली होती.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : जिल्ह्यातील बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलविणार

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : सन २०१५ चा अर्थसंकल्प सादर करताना एसटी बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलण्याची घोषणा अर्थमंत्री म्हणून आपण केली होती. या घोषणेला अनुसरून चंद्रपुरातील मुख्य बसस्थानकाचे आधुनिकीकरण व नुतनीकरणासाठी १६ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. या कामाचे भूमिपूजन पाच सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या हस्ते करताना आनंद होत आहे. चंद्रपुरातील बसस्थानक आधुनिक स्वरूपात १८ महिन्यांच्या कालावधीत नागरिकांच्या सेवेत रूजु होईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन आणि वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.प्रजासत्ताक दिनी चंद्रपूर येथील मुख्य बस स्थानकाच्या आधुनिकीकरण व नुतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन पाच सेवानिव़ृत्त एसटी कर्मचाºयांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ना. मुनगंटीवार बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आ. नाना श्यामकुळे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे, एसटीचे विभाग नियंत्रक कार्तीक सहारे, विभागीय अभियंता राहुल मोडकवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, बल्लारपूर आणि मूल या बसस्थानकांचे आधुनिकीकरण व नुतनीकरणाचे काम सुद्धा सुरू करण्यात आले आहे. यापुढील काळात पोंभुर्णा, नागभीड, चिमूर, गोंडपिपरी, कोरपना, घुग्गुससह सर्वच ठिकाणची बसस्थानके देखणी होतील. बसेसच्या खरेदीसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. नव्या बसेसमधील १० टक्के बसगाड्या चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये देण्याबाबत आपण परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा केली आहे, असे सांगितले.यावेळी एसटी कर्मचारी संघटना, बसस्टॅन्ड कर्मचारी संघटना, आॅटोरिक्षा संघटना, ग्रामीण पत्रकार संघ आदी संघटनांनी ना. मुनगंटीवार यांचा सत्कार केला. तर स्वातंत्र्य संग्राम सैनिक शंकरलाल लांजेवार यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विभाग नियंत्रक कार्तिक सहारे यांनी केले. संचालन शीतल गौड यांनी तर आभार विभागीय अभियंता राहुल मोडकवार यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.मूल बसस्थानकाचे भूमिपूजनमूल : १० कोटींचा निधी खर्च करून मूल येथे सुशोभित बसस्थानक साकार होणार आहे. बस स्थानकाचे आधुनिकीकरण व नुतनीकरण कामाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भूमिपूजन केले. या कार्यक्रमाला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, आ. संजय धोटे, नगराध्यक्ष प्रा. रत्नमाला भोयर, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, न. प. उपाध्यक्ष नंदू रणदिवे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, मुख्याधिकारी सरनाईक, विभाग नियंत्रक कार्तिक सहारे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रास्ताविक सहारे यांनी केले. संचालन प्रवीण मोहुर्ले तर आभार राहुल मोडक यांनी मानले.